Home माझं गाव माझं गा-हाणं रावळगांवच्या भवानी बाबाचा चमत्कार! नवरी लाखो रुपये घेऊन दोन दिवसात फरार!!

रावळगांवच्या भवानी बाबाचा चमत्कार! नवरी लाखो रुपये घेऊन दोन दिवसात फरार!!

135
0

राजेंद्र पाटील राऊत

रावळगांवच्या भवानी बाबाचा चमत्कार!
नवरी लाखो रुपये घेऊन दोन दिवसात फरार!!
(शंकरराव विसपुते प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नांदगाव, दि.१०- शुभमंगल सावधान पार पडताच नवी नवरी अवघ्या दोनच दिवसात लाखो रुपयांवर हात साफ करुन पसार झाल्याने नांदगाव,पुणे,रावळगांव भागात मोठीच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,नांदगाव शेजारील गंगाधरी गावाच्या शिवारात हि घटना घडली.लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सत्यनारायण पुजा आटोपताच नवी नवरी तीन लाख अठ्ठ्यान्नव हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाल्याने अविवाहित वधू वरांच्या पालकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून,धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातल्या वडकीनाला येथील वडापाव विक्रेता निलेश दरेकर वय३४ याने विवाह जमवून फसविणा-या टोळीच्या विरुध्द नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या टोळीत अहमदनगर जिल्ह्यातील दोन महिलासह मालेगांव तालुक्यातील रावळगांव येथील एकूण चार जणांचा समावेश आहे.
संतोष उगलमुगले मालेगांव,योगेश वाघ रावळगाव,बालाजी आहेर, विजय चव्हाण रावळगांव,पुजा शिंदे एकरुखे ता.राहाता जि.अहमदनगर,मुलीचे मामा आनिल मोरे,मामी शितल मोरे अशी आरोपीची नावे आहेत.गंगाधरी ता.नांदगाव येथे २४जुन२०२० रोजी हि घटना घडली.लग्नात पुजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख नव्वद हजाराचे सोन्याचे व नऊ हजाराचे चांदीचे दागिने निलेशने घातले होते.
————–रावळगांवचा भवानी बाबा मुख्य म्होरक्या————–
वडकीनाला येथील हातगाडीवर पाववडयाची विक्री करणाऱ्या निलेश दरेकर याने नांदगावला राहणाऱ्या आपल्या मामा व त्याच्या मुलामार्फत लग्न जमत नाही म्हणून प्रयत्न सुरु ठेवलेले होते.मामेभावाच्या मनमाड येथे राहणाऱ्या मित्राने मालेगांव तालुक्यातल्या रावळगांव येथील भवानी बाबा हे लग्न जमवतात असे सांगितले, त्याप्रमाणे भवानी बाबाच्या संपर्कात ते आले.येथूनच लग्न जमविण्याचे औट घटकेचे नाटक सुरु झाले.चांगली मुलगी दाखवितो मात्र ५० हजार रुपये लागतील असे भवानीबाबाने सांगितले .तीन मुलीची फोटो मोबाईलवर पाठवून त्यातील एक मुलगी निलेशला पसंत पडली.ती मुलगी अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातील एकरुखे येथील होती.मुलगी पसंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यासाठी मुलीच्या आईला तीन लाख रुपये द्यावे लागतील असे भवानीबाबाने सांगितले.कोपरगांवला कोर्ट बंद असल्यामुळे त्याच दिवशी सगळेजण नांदगाव शेजारील गंगाधरी गावाच्या शिवारात मामाच्या शेतात आले.लग्नसोहळा रात्री झाला.दुसऱ्या दिवशी नवरी पुण्याला गेली.सत्यनारायण पुजा संपताच मध्यरात्री तिच्या आईची प्रकृती बिघडल्याचे निमित सांगून एका कारमध्ये बसून ती निघून गेली.त्यानंतर नवरदेव निलेश दरेकर याने अनेकदा फोन करुनही नवरी पुजा अखेरपर्यत काही आलीच नाही.अशा पध्दतीने लग्नाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here