• Home
  • जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांना दुबई येथे जीवनगौरव पुरस्कार

जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांना दुबई येथे जीवनगौरव पुरस्कार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220329-WA0078.jpg

जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांना दुबई येथे जीवनगौरव पुरस्कार

नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गेल्या पन्नास वर्षापासून अविरत आंबेडकरी चळवळीत काम करणारे,दलित समाजासाठी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देणारे सामाजिक कार्यासह सांस्कृतिक व धार्मिक, राजकारण, क्रीडा यात सक्रिय सहभाग घेणारे जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल दुबई येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नधाव फाउंडेशन व महालँड ग्रुप त्याचबरोबर दुबई येथील सफर संस्थेच्यावतीने दुबईमध्ये २९ मार्च रोजी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही व्यक्तींना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मुखेड तालुक्याचे व मराठवाड्याचे आंबेडकरी चळवळीचे दलित नेते जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे हे सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक ,राजकीय ,क्रीडा यासह विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दशरथराव लोहबंदे हे पुणे येथून दुबईला रवाना होणार आहेत. २९ मार्च रोजी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांचे दि. ३१ मार्च रोजी मुखेड शहरात आगमन होणार आहे. आगमनानंतर दुपारी दोन वाजता मुखेड शहरात जंगी स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment