Home नाशिक श्रीक्षेत्र गोरक्ष नगर कारवाडी वनसगाव येथे जीवा शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने...

श्रीक्षेत्र गोरक्ष नगर कारवाडी वनसगाव येथे जीवा शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने धर्मनाथ बीज महोत्सवाची सांगता

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_212028.jpg

श्रीक्षेत्र गोरक्ष नगर कारवाडी वनसगाव येथे जीवा शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने धर्मनाथ बीज महोत्सवाची सांगता

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

परमेश्वराने मान्यवाला सुंदर नरदेह दिला असून त्या नरद याचा आपल्या जीवनाची सार्थक होण्यासाठी नामस्मरण करणे गरजेचे आहे नामस्मरण करताना कामात राम करून आपण प्रपंचही केला पाहिजे.जीवनात ज्यांनी फक्त प्रपंच केला त्याला यम घ्यायला येतोय.प्रपंचासाठी लोक खूप रडतात.जे देवासाठी रडले ते देवाच्या कडेवर गेले.जीवन सार्थक होण्यासाठी प्रपंच बरोबर परमार्थ केला तर निश्चितच देव घ्यायला येईल असे प्रतिपादन
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र गोरक्ष नगर गोरक्षनाथ मंदिर कारवाडी वनसगाव येथे आयोजित भव्य धर्मनाथ बीज महोत्सव कार्यक्रमात ते काल्याच्या कीर्तनात जीवा शिवाचं ऐक्य सांगणाऱ्या कीर्तनातून निरुपण करतांना बोलत होते.
श्रीकृष्णाच्या अगाथ लीलांचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाचे मुळ नवनारायण असुन जोपर्यंत साधु संतांचा सन्मान आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहतील. साधुसंतांचा सन्मान केला तर सुखाची प्राप्ती होते. तुम्ही जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा अधिक प्रेम तुम्हाला समाजाकडून मिळेल यासाठी आपण निस्वार्थपणाने परमार्थ करताना सामाजिक कार्यातही आपलं योगदान देणे महत्त्वाचे आहे. मनुष्याला देव ओळखता आला पाहिजे परंतु समाजात काही लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत ही देव ओळखता आला नाही म्हणून त्यांचा जन्म वाया गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काल्याचे कीर्तनाच्या सांगता प्रसंगी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित ओम चैतन्य कानिफनाथ आश्रमाचे मठाधिपती अण्णा बाबा शिंदे, काल्याची कीर्तनकार धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव, भुताने येथील नाथ भक्त तान्हाजी आहेर, उंबरखेड येथील समर्थ सद्गुरु सदाशिवनाथ महाराज निफाड तालुका अध्यक्ष निवृत्ती महाराज आथरे, महाप्रसादाचे आयोजक रामदास यशवंत डुंबरे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार डॉ योगेशजी डुंबरे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच गोरक्षनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने भव्य दिव्य कमान करून दिल्याबद्दल ट्रेकर्स ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून मनेष कुमार विठ्ठलराव शिंदे या धर्मनाथ बीज सोहळ्यात चारही दिवस पंगत देणारे सर्वश्री रंगनाथ हरिभाऊ शिंदे ,विश्वनाथ शंकर कापडी, अशोक माधवराव ढोमसे तसेच राम लखन मंडप चे संचालक ,आचारी समीर पठाण आदींचा यावेळी अण्णा बाबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच चारही दिवस उत्कृष्ट संगीताची साथ देणारे मृदंग वनी ओंकार महाराज रायते गायनाची साथ देणारे ऋषिकेश महाराज नवले नवनाथ महाराज बत्तासे प्रशांत महाराज रायते भास्कर अप्पा गारे केशव आप्पा रायते संजय महाराज काळे, काकडा सम्राट गोटराम बाबा मांडवडकर, विणेकरी गणपत बाबा लगड आदींचा सप्ता कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोकराव गारे, बाळासाहेब शिरसाठ, आबा ढोमसे, नवनाथ माऊली बोरगुडे शंकरराव कोल्हे शंकराव पवार पार्थ सूर्यवंशी निवृत्ती महाराज आथरे, ट्रेकर्स ग्रुपचे सर्व सदस्य, जयराम बाबा खानगाव, राजेंद्र शिंदे सर, हभप उत्तमराव शिंदे, भाऊराव शिंदे,भुषण शिंदे, रघुनाथ शिंदे, लक्ष्मण आण्णा शिंदे, शिवाजी दादा शिंदे,गोपाळ मामा शिंदे,दत्तु मामा शिंदे, सरपंच महेश केदारे ,टी जी शिंदे सर, सचिन शिंदे, डॉ योगेश डुंबरे, श्रीमती शितल जाधव आदींसह वनसगाव ,थेटाळे, खानगाव ,खडक माळेगाव ,कोटमगाव लासलगाव ,अंतरवेली भुताने पिंपळगाव बसवंत, उंबरखेड ,बेरवाडी, सारोळे, रानवड उगाव, खेडे, सोनेवाडी आधी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक माता भगिनी व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर यांनी मानले.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथे बंदूक जप्त..
Next articleज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here