आशाताई बच्छाव
रांजणगावात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या जालन्याच्या भामट्यास नागरीकांनी पकडले
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – रांजणगाव येथे चोरीच्या उद्देशाने घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला घरमालक व नागरीकांनी सतर्कतेने पकडून पोलीसांच्या हवाली केले.चोरी करणारा हा भामटा जालना जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची महिती अशी की, रांजणगाव ता. चाळीसगाव येथे संतोष निंबा सोनवणे हे कुटुंबासह राहतात.गुरूवारी 21 रोजी रात्री 10 वाजता हे कुटुंब जेवण करून झोपले. आज 22 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सोनवणे यांना घराबाहेर बोलण्याचा व भांड्यांचा आवाज आल्याने त्यांनी जिन्याने गच्चीवर जावून अंगणात कोण आहे हे पाहण्यासाठी गेले असता एक इसम त्यांच्या घराच्या दरवाजा लाथा मारून तोडण्याचा प्रयत्न करीत होता. सोनवणे यांनी घराबाहेरील ओट्यावरील लाईट सुरू करून चोर चोर अशी आरडाओरड केली. य आवाजाने शेजारील लोक घराबाहेर आले व त्यांनी दरवाजाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास पकडले.
या घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना दिल्यानंतर पेालीसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर इसमाची विचारपूस केली असता अनिल विश्वनाथ मराडे (32) रा. वाळकेश्वर मंदिर, जुना देवगाव रोड, लहान यशवंत जि. जालना असे सांगितले.चोरीच्या उद्देशाने दरवाजाची कडी तोडतांना तसेच मच्छिंद्र सोनवणे यांच्या अंगणातील अल्युमिनीअमचे पातेले चोरून नेल्याप्रकरणी संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित अनिल मराडे याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






