Home अमरावती चांदूरबाजार एसटी बस स्थानकात प्रवाशाचा जीव धोक्यात

चांदूरबाजार एसटी बस स्थानकात प्रवाशाचा जीव धोक्यात

144
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0056.jpg

चांदूरबाजार एसटी बस स्थानकात प्रवाशाचा जीव धोक्यात

किरण सिनकर, आशिष कोरडे, सुमित निंभोरकर, मयूर खापरे व बाबराव खडसे यांच्या समयसूचकता मुळे वाचले वृध्दाचे प्राण

तालुका प्रतिनिधी -मयुर खापरे

चांदूरबाजार बस स्थानकात आगार व्यवस्थापकाचे नियंत्रण राहिले नसून दररोज दुपारी ४ते ६ वेळात विद्यार्थी व प्रवाशाची गर्दी होत असून २१ सप्टेंबरला दुपारी ५.३० ला आगारातच प्रभाकर रेखातेचा एसटी बसमध्ये चढताना अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला आहे.
दुपारी ५.३० ला देऊरवाडा येथील प्रभाकर गंगाराम रेखाते वय ५५,
हे त्यांच्या पत्नीस औषधा उपचार करिता अमरावती येथे एसटी बसने जाण्याकरता चांदूरबाजार बस स्थानकात आले असता नेहमीप्रमाणे दुपारी ४ ते ६ या वेळात या स्थानकात गर्दी होत असल्याने याही दिवशी प्रवाशाची व विद्यार्थ्यांची गर्दी होती, तेव्हा क्रमांक एम एच ४० एन ९९६९ अमरावती जाणाऱ्या एसटी बस मध्ये चढताना त्यांना एसटीचे गेटचा तुटलेला पत्रा त्यांच्या पॅन्टला लागला तेव्हा ते पडले व मागच्या चाकात त्याचा पाय आल्याने पाय फ्रॅक्चर झाला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी टिकू अहिर वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र मंडळी किरण सिनकर, आशिष कोरडे, सुमित निंभोरकर, मयूर खापरे व बाबराव खडसे सोबत एसटी बस स्थानकाचे जवळ त्यांचे मित्रांना भेटण्याकरता आल्यामुळे प्रभाकर रेखाते यांना त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन दवाखान्यात पाठविले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहे.
यावेळेस आगारातील स्पीकर पूर्णतः बंद होते. तेथे कोणताही सुरक्षारक्षक हजर नव्हता, आगार व्यवस्थापक बस स्थानकाचे मागील बाजूस त्यांचे कार्यालयात १००० मीटर अंतरावर बसतात त्यांना प्रवाशाची कोणतीही फिकर नाही. यामुळे चांदूरबाजार बस स्थानकात प्रवाशाचा जीव धोक्यात आलेला आहे.

Previous articleरांजणगावात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या जालन्याच्या भामट्यास नागरीकांनी पकडले
Next articleलोह्यात संसर्गजन्य ताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; साफसफाईकडे दुर्लक्ष!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here