आशाताई बच्छाव
नर्मदेत कोसळली महाराष्ट्राची बस 13 मृत्यू हाती: मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली 40 प्रवासी होते स्वार: मुख्यमंत्री शिंदेंनीही घेतला दुर्घटनेचा आढावा
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एस टी महामंडळाची बस कोसळुन झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आतापर्यंत 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्ये प्रदेश मधील खरघोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाची योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
एसटी महामंडळाला केल्या सूचना
मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटना संदर्भात मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
नियंत्रण कक्ष स्थापन
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या अपघाता संदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180आणि 02572217193 असा आहे आज सकाळी इंदूर होऊन अमळनेर कडे निघालेली एस टी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.






