Home नाशिक दारुबंदी शुल्क विभागाचे दुर्लक्ष;मालेगांव तालुक्यात ताडी अण्णाचा धुमाकूळ!!

दारुबंदी शुल्क विभागाचे दुर्लक्ष;मालेगांव तालुक्यात ताडी अण्णाचा धुमाकूळ!!

60
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220718-085352_Google.jpg

दारुबंदी शुल्क विभागाचे दुर्लक्ष;मालेगांव तालुक्यात ताडी अण्णाचा धुमाकूळ!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव– शासनाच्या दारुबंदी उत्पादन शुल्क खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने,मालेगांव तालुक्यात बोगस व बनावट ताडी विक्रीच्या माध्यमातून रग्गड कमाई करण्याचा श्री.अण्णाचा धंदा मात्र जोमात आहे तर ताडी पिणारे कोमात अशी अवस्था आहे.
मालेगांव शहरासह तालुक्यात येसगांव,बंधारपाडा सौंदाणे,करंजगव्हाण,वडनेर आदी ठिकाणी विक्री केली जाणारी ताडी ही बोगस व बनावट स्वरुपात भेसळ करुन तयार केली जात असल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.पोटफुगी सारखे घातक व गंभीर आजार त्यातून या ताडी पिणा-यांना लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
ताडी बनविताना मुळ झाडावरील ताडीत घातक असे रसायन मिश्रीत करुन सडवलेल्या तांदुळाचे पाणी व नशा येण्यासाठी झोपेच्या गोळ्या मिक्स करुन हि ताडी सर्रासपणे विक्री केली जात आहे,त्याशिवाय या ताडी विक्री दुकानाच्या नावाखाली बेकायदेशीर देशी विदेशी दारु देखील विक्री केली जात असल्याचा भयानक प्रकार घडत आहे.जिल्हाधिकारी नाशिक यांनी खरोखरच तालुक्यात किती ताडी दुकानाना मान्यता दिलेली आहे याचीही वरिष्ठ पातळीवरुन एकदा सखोल व कसून चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here