Home मराठवाडा बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस...

बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 🛑

96
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला असता विविध घडामोडींबाबत माझी मते व्यक्त केली.

कोविड-१९ लसीच्या प्रगतीसंदर्भात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांशी एक-दोन दिवस आधीच माझी चर्चा झाली. लवकरात लवकर ही लस रास्त किमतीत उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र व देशातील नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले संस्थेचे प्रयत्न स्तुत्य आहेत.

माझ्या वाचनात आले की विविध देशांचे राजदूत पुण्याला जाऊन लसीसंदर्भात माहिती घेत आहेत. देशाचे मा. पंतप्रधान देखील पुण्याला भेट देण्याची शक्यता आहे. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, यातून कोरोना लसीबाबत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना प्रोत्साहन मिळेल.

महाराष्ट्रात आज जे महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याला जनतेचा मिळणारा पाठिंबा पाहून समोरच्या विरोधी पक्षाचे नैराश्य वाढले आहे.

त्या नैराश्याचे प्रतिक त्यांची सध्याची वक्तव्ये आहेत. आता आपल्याला सत्ता मिळणार नाही याबाबतची अस्वस्थता व संताप या माध्यमातून व्यक्त केला जात आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here