Home कोकण सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वसई तालुका कडून जागतिक वारसा सप्ताह वसई किल्ल्यात स्वच्छता मोहीम...

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वसई तालुका कडून जागतिक वारसा सप्ताह वसई किल्ल्यात स्वच्छता मोहीम घेवून साजरा करण्यात आला 🛑

112
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वसई तालुका कडून जागतिक वारसा सप्ताह वसई किल्ल्यात स्वच्छता मोहीम घेवून साजरा करण्यात आला 🛑
✍️ वसई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वसई :⭕पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई अंतर्गत सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, पुणे आणि वारसा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक वारसा साप्ताह, २०२० (दिनांक १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२०) विविध स्पर्धा, व्याख्याने व स्वच्छता मोहीम यांच आयोजन करण्यात आले आहे.
युनेस्कोव्दारा १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन तसेच भारत सरकार व्दारा १९ ते २५ नोव्हेंबर हा जागतीक वारसा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश जन सामान्यांमध्ये प्राचीन वारश्याबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करणे हा असतो. ह्या जागतिक व देशव्यापी मोहीमेचा भाग म्हणून राज्य सरकारच्यावतीने १९ ते २५ नोव्हेंबर २०२० ह्या दरम्यान जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा करीत आहे,
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे या निमित्ताने प्राचीन वारश्या संबंधी व्यापक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत,जनसामान्यांमध्ये प्राचीन स्मारके व वस्तु जपण्याची भावना या आयोजनामुळे वाढीस लागेल व वारसा जतनाचे कार्य केवळ सरकारचे नसून त्यात जनसहभागही आवश्यक आहे हे अधोरेखित होईल.
वसई किल्ला हा अतिशय देखणा असलेला हा किल्ला अनेक वास्तू आपल्या उदरात ठेवून आहे त्याची अनुभूती आम्हाला कायम जाणवते, याच गडावरील वास्तूंचे जतन, संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान झटत आहे.
दुर्ग संवर्धन हे नाव घेतले, ऐकले किंवा वाचले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते एखाद्या गडाचे चित्र किंवा एखादी वास्तू. मूळात संवर्धन करणे किंवा संवर्धन या शब्दाची फोड करायचे म्हटले तरी त्याचा अर्थ वर वर सोपा वाटत असला तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे, दुर्ग संवर्धन हे कार्य एका दिवसाचे किंवा एका वर्षाचे नसून ती सातत्याने चालणारी तसेच फक्त भावनिक नजरेने न पाहता त्याचा अभ्यास करून त्याची माहिती आणि महत्त्व जाणून घेणारी कार्यप्रणाली होय..

मोहिमेत सहभागी झालेले दुर्गसेवक / दुर्गसेविका
अनिकेत कुडतरकर (सह्याद्री प्रतिष्ठान वसई तालुका प्रतिनिधि), मनोज मोरे (सह्याद्री प्रतिष्ठान नालासोपारा शहर प्रतिनिधि),अविनाश घाडगे,अमोल अडखळे (सह्याद्री प्रतिष्ठान वसई शहर प्रतिनिधि)
अजय चव्हाण,गौरी मोरे, सुशांत मोरे, मनिष दळवी, भावेश लाड, राहूल पुरोहीत.
*पालघर जिल्हा_विभाग*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र – घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here