• Home
  • छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि दोस्ती फाउंडेशन यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि दोस्ती फाउंडेशन यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201125-WA0026.jpg

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि दोस्ती फाउंडेशन यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी -⭕छावा प्रतिष्ठान रत्नागिरी, दोस्ती फाउंडेशन चाफे आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल यांच्या सयुक्त विद्यमाने चाफे गावडेवाडी कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चाफे गावडेवाडी मध्ये शिबिर ग्रामस्थांचा चांगल्या प्रतिसादात व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिबिर संपन्न झाले.

याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सुनिल धावडे, सचिव श्री.समीर गोताड, खजिनदार श्री.गणेश कांबळे, कार्याध्यक्ष श्री.संतोष आग्रे, प्रवक्ता श्री.संगम धावडे, तसेच दोस्ती फाउंडेशन चाफे चे अध्यक्ष – अनिकेत गावडे, उपाध्यक्ष – निशा गावडे, सचिव – सुरज गावडे, आणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सुनिल धावडे यांनी स्थानिक मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा परिसरातील ११० नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराला चाफे गावच्या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिरास शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व दोस्ती फाउंडेशन चाफे चे सदस्य श्री.संदेश धावडे, विजय धावडे, मुकेश धावडे, स्नेहल गावडे, प्रफुल्ल गावडे, रितेश गावडे, पार्थिव गावडे, समीर गावडे, अजय गावडे, सौरभ गावडे, साक्षी गावडे, पूनम गावडे, पूजा गावडे, अँना गावडे यांनी विशेष मेहनत घेतली.या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment