Home नाशिक सटाणा पोलिस स्टेशन तरुण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीच्या प्रतीक्षेत

सटाणा पोलिस स्टेशन तरुण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीच्या प्रतीक्षेत

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0047.jpg

सटाणा पोलिस स्टेशन तरुण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीच्या प्रतीक्षेत

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

सटाणा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांची बदली होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिस अधिकारी ची नेमणूक न झाल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सध्या पोलिस स्टेशनचा कारभार नियुक्त असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सांभाळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप पर्यंत तरी नवीन अधिकाऱ्याचा शोध लावून नियुक्ती देता आलेली नाही. गेल्या दिड वर्षाचा कालावधी बघता बरेचशे पाणी पुला खालून वाहून गेले आहे. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या जागेवर तरुण, तडफदार, चाणाक्ष आणि कर्तव्यदक्ष सिंघम पोलिस अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत सटाणा पोलिस स्टेशन आहे.
गेल्या दिड वर्षात शहरात झालेल्या घरफोड्या दुचाकी वाहनांची चोरी गेल्या वर्षी एटीएम फोडण्याचा झालेला प्रयत्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्री साठी ट्रॅक्टर मधून आणलेल्या मालाची व वाहाणांची चोरी, अश्या एक ना अनेक घटना घडूनही बदलून गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना त्याचा छडा लावता आला नाही. गेल्या काही काळात अनेक तक्रारी पोलिस स्टेशन पर्यंत येऊनही त्या परस्पर मिटवल्या गेल्या त्याची पोलिस स्टेशन च्या दप्तरी नोंद झाली नाही.
काही पोलिस देखील आपणच अधिकारी असल्याच्या आविर्भावात जनतेशी वागतात. चोर सोडून संन्याशाला पकडतात आणि राजरोसपणे पैशांची मागणी करून पोलिस स्टेशनचे नाव बदनाम करण्याचे काम करतात यापूर्वी या गोष्टींना चाप बसलाच नाही गेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात काही लुंगे पत्रकार व स्वःताला पुढारी समजणा-यांचे पोलिस स्टेशन ला येणे जाणे होते.
त्यांच्याकडूनही पोलिस स्टेशन चे नाव खराब करण्याचे काम झाले आहे. या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी कर्तव्यदक्ष सिंघम पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे.
सटाणा पोलिस स्टेशनचा विस्तार बघता लखमापूर व हे दोन दुर परिक्षेत्र आहेत. शहराची व तालुक्याची लोकसंख्या पाहता पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या खूप तोकडी आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून सक्षम पोलिस अधिकारी व कर्मचा-याची नेमणूक होणे गरजेचे आहे. गेल्या तीन महिन्यापासून पोलिस अधीक्षक नव्याने आल्या नंतर त्यांनी अनधिकृत धंद्यावर टाच आणली. याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले मात्र सटाण्यातील पाठक मैदान रिंग रोड, सुकड नाला व शहरातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेत उदास दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याला देखील बदलून गेलेल्या पोलिस निरीक्षकांना आळा घालता आला नाही.
बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिसांनी गेल्या वर्षात अनधिकृत धंद्यावर धडक कारवाया करून गुन्हे दाखल केले. खुनाच्या प्रकरणाचा छडा लावला.गुटखा-मटका आणि कतली साठी नेणाऱ्या वाहाणांना जायखेडा पोलिसांनी सळो की पळो करून सोडले. मात्र अशी धडक कार्यवाही सटाणा पोलिसांना गेल्या दिड वर्षात करता आली नाही मग असे काहीच सटाणा पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडले नाही का? अशी शंका ही उपस्थित राहते. कालच मालेगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस काही मिनिटांतच फोडले लाखो रुपये लंपास झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या सतर्कतेमुळे रात्रीच चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि परिसरातील रस्त्यावर येणाऱ्या पोलिस स्टेशन ला सतर्क करून नाका बंदी केली आणि घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिती दिली. वरिष्ठ पोलिस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी तत्काळ दखल घेऊन तपासाची दिशा निश्चित करून तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसापासून सटाणा पोलिस स्टेशन ला पोलिस निरीक्षक नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकाची नेमणूक करताना कुणाच्या मर्जीतले नसलेले असे तरुण, तडफदार, चाणाक्ष, कर्तबगार अश्या सर्व गुण संपन्न सिंघम अधिकारी तालुक्याला हवा आहे. देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या नगरीत असलेल्या पोलिस स्टेशनमधील खुर्ची त्या अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. असाच अधिकारी सटाणा नगरीला लाभावा अन्यथा आज प्रभारी म्हणून जे अधिकारी कामकाज पाहत आहेत. त्यांचाच कालावधी वाढवून दिल्यास मागील काळात जनतेच्या झालेला भ्रम निराश भरून निघेल यात शंका घेण्याचे काहिच कारण असू शकतं नाही तसे तरी वरीष्ठ अधिका-यांनी करावे हीच अपेक्षा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here