Home कृषिसंपदा ऊस तोड महिला हिरकणीची कथा ! उसाचे ट्रक, ट्रॉली रचून दाखवून देतात...

ऊस तोड महिला हिरकणीची कथा ! उसाचे ट्रक, ट्रॉली रचून दाखवून देतात आपली उंची

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0037.jpg

ऊस तोड महिला हिरकणीची कथा !
उसाचे ट्रक, ट्रॉली रचून दाखवून देतात आपली उंची

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

पहाटे पाच वाजता उसाच्या फडात जायचं… दिवसभर ऊस तोडायचा… तो बांधायचा… आणि रात्री-बेरात्री कडाक्याच्या थंडीत वाहने भरून द्यायची; पण एवढं करूनही रस्त्यावरून जाताना उसाने भरलेली वाहने रस्त्यावर पडतात तेव्हा मात्र उसतोडणी मजुरांचा संघर्ष जीवनाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करून, दमून आपल्या झोपडीत थोडा आराम घेत असलेल्या उसतोडणी कामगार महिला रात्री-अपरात्री पुन्हा उसाच्या मोळ्या भरण्यासाठी निघतात. आपल्या अर्धनग्न चिमुरड्यांना कुशीत घेऊन त्यांना मायेची ऊब देण्याचं भाग्य क्वचितच त्यांना लाभते. संसाराची धुरा सांभाळत या ऊसतोड महिला उसाचे ट्रक, ट्रॉली रचुन आपली उंची दाखवून देतात.
त्यांच्या या दुःखावर फुंकर मारायला कुणीही तयार होत नाही. शेकडो किलोमीटरवरून आपला तुटपुंजा संसार घेऊन आलेली ही कुटुंबे ऊसतोड करून जगतात खऱ्या; पण कधी कधी अनेक धोक्यांचा सामना करत आपल्या प्राणाला मुकतातही. असे असले तरी महिला ऊसतोडणी मजुरांच्या व्यथांचा थोडा तरी माणुसकीच्या नात्याने सर्वच स्तरातून होणे गरजेचे आहे.
गरोदर मातांची व्यथा ऊस तोडणीवर असतानाच प्रसूती होणं, रुग्णालये व इतर | सुविधांविना नवजात बालकांना त्याच ठिकाणी जमिनीच्या पोटात घालणं मनाला हेलावून टाकतं. सहा महिने गावाकडे आणि सहा महिने परजिल्ह्यात जाण्याने साऱ्या संसाराची फरफट होते. ना पाणी, ना वीज, ना अन्य जीवनावश्यक सुविधा…! काबाडकष्ट करून मुलांना दोन वेळचं जेवण पुरवण्याचीही कमाई कधी कधी त्यांना उपाशी ठेवते. अशा स्थितीत त्यांच्या बालकांना शिक्षण काय मिळणार? आपली जबाबदारी झटकून टाकणारे साखर कारखाने केवळ आपल्या कामाशी काम ठेवत माणुसकीला पायंदळी तुडवत केवळ आपल्या उत्पन्नातच भर घालताना दिसतात.

Previous articleशेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता ! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
Next articleसटाणा पोलिस स्टेशन तरुण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीच्या प्रतीक्षेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here