• Home
  • अमरावतीच्या कोंडेश्वर टेकडीवर आढळला मानवी सांगाडा ! ✍️अमरावती ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

अमरावतीच्या कोंडेश्वर टेकडीवर आढळला मानवी सांगाडा ! ✍️अमरावती ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑 अमरावतीच्या कोंडेश्वर टेकडीवर आढळला मानवी सांगाडा ! 🛑
✍️अमरावती ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अमरावती :⭕मागील 39 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कोंडेश्वर येथील टेकडीवर सोमवारी, 29 जूनच्या दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मानवी सांगाडा आढळला. सायंकाळी त्या मृत व्यक्तीची ओळख पटली.

राजेश गणेश जोध (वय 48, रा. चैतन्य कॉलनी) असे सांगाडा आढळलेल्या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. 20 मे 2020 पासून राजेश जोध यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. रागाच्या भरात राजेश जोध यांनीही घर सोडले. ते व्यवसायाने चालक होते. त्यांनी आपले वाहन कोंडेश्वर येथील मंदिराजवळ उभे केले. ते पोलिसांनी जप्त केले.
नातेवाइकांच्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद बडनेरा पोलिस ठाण्यात घेतली.
परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ही बाब सोमवारी, 29 जून रोजी उघडकीस आली. मृत व्यक्तीच्या शरीराचे लचके वन्यप्राण्यांसह कुत्र्यांनी तोडले होते. घटनास्थळी वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्डसह इतर दस्तऐवज सापडले. पोलिसांनी त्याआधारे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना घटनास्थळी पाचारण केले. त्याआधारे अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. घातपाताची शक्‍यताही पोलिस पडताळून बघत आहेत.

कोंडेश्वरच्या टेकडीवर आढळलेला सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन शवागारात पाठविला. राजेश जोध यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ही बाब शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल.
पंजाब वंजारी, पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे…⭕

anews Banner

Leave A Comment