Home कृषिसंपदा शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता ! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता ! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0025.jpg

शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता ! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

आपली आणि आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिला मजुरांची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे.
याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील एका महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. ऊसतोड मजुरी करणाऱ्या महिलांपैकी दहा टक्के गर्भवती महिला आहेत, मात्र त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती नसल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याला नोटीस पाठवली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या गोळ्याला घेऊन उसाच्या फडात राबराब राबायचं. दिवसभर काम करून 200 ते 250 रुपये मिळतात. विशेष म्हणजे अगदी गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतरही असंच काबाडकष्ट करावं लागतं. यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ना कोणती प्रसूती रजा मिळते, ना बाल संगोपन सुविधा दिली जाते. सोबतच संबंधित विभागांकडून त्यांना आरोग्यदायी आहार देखील दिला जात नाही. माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं थेट सरकारला नोटीस पाठवली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशा 152 गरोदर ऊसतोड महिला मजूर आहेत. श्रीगोंदा तहसील अंतर्गत येणाऱ्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असा गरोदर महिला कामगारांचे सर्व्हेक्षण केलं जातं. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूलभूत हक्क आणि आरोग्याबाबत जागरूक केलं जातं. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक यांची मदत , घेतली जाते.

गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत जागृती नाही!

श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. ज्यात देवदैठण येथील साईकृपा फेज वन, हिरडगाव येथील साईकृपा फेज टू, श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या चारही साखर कारखान्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि बीड शहरातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने येत असतात. यात गरोदर महिलांचेही मोठे प्रमाण असते. मात्र त्यांच्यात आरोग्याबाबत म्हणावी तशी जागृती पाहायला मिळत नाही. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर नेमकी काय काळजी घ्यायला हवी यासाठी आरोग्य विभागाकडून त्यांना मार्गदर्शन करण्याचा तोकडा प्रयत्न केला जातो.

Previous articleराजमाता जिजाऊ शोभायात्रेने देगलूर शहर दुमदुमले ▪️शालेय लेझीम ने देगलुरकराची मने जिंकली
Next articleऊस तोड महिला हिरकणीची कथा ! उसाचे ट्रक, ट्रॉली रचून दाखवून देतात आपली उंची
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here