Home नांदेड राजमाता जिजाऊ शोभायात्रेने देगलूर शहर दुमदुमले ▪️शालेय लेझीम ने देगलुरकराची मने जिंकली

राजमाता जिजाऊ शोभायात्रेने देगलूर शहर दुमदुमले ▪️शालेय लेझीम ने देगलुरकराची मने जिंकली

257
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0032.jpg

राजमाता जिजाऊ शोभायात्रेने देगलूर शहर दुमदुमले

▪️शालेय लेझीम ने देगलुरकराची मने जिंकली

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर शहरातील उदगीर रोड येथील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकाची नियोजन जागेपासून ते शहरातील अण्णाभाऊ साठे चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा गांधी चौक,महात्मा बसवेश्वर चौक,कापड बाजार हनुमान मंदिर कॉर्नर, जुनी भट्टगल्ली शाळा,होट्टल बेस हनुमान मंदिर,शहीद भगतसिंग चौक,सेना महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परत जिजाऊ चौक येथे शोभा यात्रेचे सांगता करण्यात आली.
यावेळी भजन पथक,पुणे येथील महिला ढोल ताशा पथक,शालेय लेझीम पथक,पथनाट्य, कळषधारी महिला,सामाजिक संदेश , विशेष म्हणजे यामध्ये उर्दू शाळेचे सुद्धा सहभाग उल्लेखनीय आहे.
देगलूर शहरातील बहुचर्चित जिजाऊ जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेची चर्चा गगनभरारी घेत आहे, या मागचे कारणही तितकेच महत्वाचे आहे , ते म्हणजे हे कार्य यशयस्वी व्हावे यांसाठी उच्च शिक्षित शिक्षिका , शिक्षक,वकील डॉक्टर, पत्रकार,युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आदीनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ देऊन कार्ये केले.
जस म्हणलं जातं ” यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ” असे म्हणतात तसे या उक्तीला साजेशा म्हणजे या महिलांचा भव्य शोभा यात्रेसाठी अनेक पुरुषांच्या हात होते हे मात्र निश्चित आणि या कार्यासाठी अनेक देणगीदारांनी सढळ हाताने मदत करून या कार्याची धुरा सांभाळली तर उच्च शिक्षित व अनेक पेशात पारंगत व्यक्तीने वेळ देऊन कार्य लीलया पेलले आहे.

यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.जितेश अंतापुरकर,मा.नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवर,भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रा) व्यंकटराव पाटील,कॉग्रेस तालुका अध्यक्ष बळेगावकर, माजी अध्यक्ष प्रीतम देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अँड अंकुश देशाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही शोभा यात्रा पार पडली.शोभा यात्रेचे सूत्रसंचालन चैतन्या वानखेडे व डॉ.सुनील जाधव यांनी केले असून भव्य शोभा यात्रेची सुरुवात जिजाऊ वंदनाने झाली. शोभा यात्रेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझीमच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व शेवट मात्र स्व. श्याम पाटील कुशावाडीकर यांना आदरांजली देऊन करण्यात आला.

Previous articleप्लेग’च्या साथीने मृत्यू स्वीकारून समाजासाठी फुले दांपत्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय -डॉ. दिलीप पुंडे
Next articleशेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता ! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here