Home नांदेड लोह्यात संसर्गजन्य ताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; साफसफाईकडे दुर्लक्ष!

लोह्यात संसर्गजन्य ताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; साफसफाईकडे दुर्लक्ष!

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0088.jpg

लोह्यात संसर्गजन्य ताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; साफसफाईकडे दुर्लक्ष!

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा नगरपालिका प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असाच प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या व डासांची होणारी उत्पत्ती यामुळे शहरात व्हायरल फिव्हर तसेच डेंग्यु तापीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती होणे आवश्यक आहे. संपूर्ण शहरात पूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक सफाई कामगार नाहीत. सकाळी ओला व सुका कचरा गोळा करणारी घंटा गाडी त्यांच्या सोईप्राणे दोन-तीन दिवसाला येते.

त्यावर कोणाचे नियंत्रण नाही मुख्याधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार कार्यालयात येतात कोणी तक्रार घेउन गेले तरपालीकेत त्याची दखल घेतली जात नाही.सताधारी मात्र एकमेकाच्या विरोधात तक्रारी करण्यात दंग आहेत

शहरात अनेक भागात रस्ते, नाल्या नाहीत. पण काही भागात रोडवर रोड केले जात आहेत. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लोकांना लुभावण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे.

पण दुसरीकडे नाल्या डुंबलेल्या, जागोजागी कचल्याचे ढिगारे, बंद पडलेले पथदिवे याकडे मात्र पालिकाप्रशासनाचे लक्ष नाही स्मशानभुमी जवळ मुक्ताई नगरातून नालीचे पाणि मुख्य रोडवर आले व रस्ता खड्डेच खड्डेमय झाला महिना दीड महिना झाला तरी मुख्याधिकारी यांनी कोणतीही उपाय योजना केली नाही.

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. मागीलवर्षी याच दिवसात एका २१ वर्षीय तरुणाचा डेंग्यु तापीमुळे मृत्यू झाला होता. पण त्यापासून पालिका प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही, शहरात दोन तीन महिन्याला धूर फवारणी व्हायला पाहिजे. पण या मूलभूत सुविधेकडे सोयीस्करपणे
दुर्लक्ष होत आहे.

व्हायरल फिव्हर, डेंग्यु, तापाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरात यूळ फवारणी करण्यात यावी,

अशी मागणी राज्यातील सताधारी शिवसेनेचे तालुका प्रमुख मिलिंद पाटिल पवार यांनी केली आहे. मुख्यकारी यांनी शहरात वार्डावार्डात फेरपटका मारावा व जनसामान्यांच्या भावना जाणून घ्याव्यात अशी अपेक्षा शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पाटिल पवार यांनी व्यक्त केली

Previous articleचांदूरबाजार एसटी बस स्थानकात प्रवाशाचा जीव धोक्यात
Next articleलोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ; अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here