Home भंडारा खैरलांजी येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीत पेन ,वहीचे वाटप

खैरलांजी येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीत पेन ,वहीचे वाटप

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240107_093107.jpg

खैरलांजी येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीत पेन ,वहीचे वाटप

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी तर्फे खैरलांजी येथील गोपाळ वस्तीत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वही व पेन वाटप करण्यात आले .

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर,
जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश गजभिये, तालुका महासचिव अमित नागदेवे,तालुका महिला महासचिव शितल नागदेवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
डी जी रंगारी यांनी गोपाळ वस्तीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाकरता सर्वांसाठी शिक्षनाचे दारे खुली केली विविध समस्यांना तोंड देत ते महिलांसाठी झिजले त्यामुळे त्यांच्या आदर्श व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना व सर्वांना अधिकार दिले त्याच्या आदर्श आपण ठेवला पाहिजे असे मत डी जी रंगारी यांनी व्यक्त केले .
जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनीही सावित्रीबाई फुले यांनी यांच्या हक्क साठी शेन, दगड, धोंडे खाल्ले पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या पदावर महिला पोहोचल्या असेही मत तनुजा नागदेवे यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी महिला जिल्हा आढेक्स तनुजा नागदेवे, जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर, गणेश गजभिये, तालुका महासचिव शितल नागदेवे, व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here