Home नांदेड लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ;...

लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ; अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी

138

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0027.jpg

लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ; अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी

लोहा/प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमात लोहा शहरातील अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत लोहा नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बळीदान दिले शूर वीरांना , शहिदांना वीरांगणानना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य अमरत कलश यातल्या दि. २०-९-२०२३ रोजी सकाळी ११ वाजता लोहा न.पा.च्या प्रगणांतून पंचप्राण शपथ घेऊन सुरुवात केली.
सदरील यात्रा लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून भाजी मंडई, पोलिस स्टेशनच्या मागील परीसर , शिवकल्याण नगर, कै.नळगे शाळा परीसर जुना लोहा तसेच सर्व प्रभागातून विद्यार्थ्यांनी रॅली काढून देशभक्तीपर नारे देण्यात आले.
तसेच या रॅलीत नागरिकांनी सहभाग नोंदवून कलशामध्ये माती अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालय, कै. विश्वनाथराव ‌नळगे‌ विद्यालय, नारायणा इंग्लिश स्कूल यांनी सहभाग नोंदवून प्रभात फेरी काढली.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, गंगाधर दळवी, चंद्रकांत सुतार,सुरज राठोड,श्री अंकले, रावसाहेब नळगे, वैजनाथ शेटे, शंकर वाघमारे, निलेश चव्हाण, दांगटे, गालफाडे आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleलोह्यात संसर्गजन्य ताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; साफसफाईकडे दुर्लक्ष!
Next articleजारीदा परिसरात रान डुक्कराच्या हल्ल्यात आदिवासी युवक गंभीर जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.