Home अमरावती जारीदा परिसरात रान डुक्कराच्या हल्ल्यात आदिवासी युवक गंभीर जखमी

जारीदा परिसरात रान डुक्कराच्या हल्ल्यात आदिवासी युवक गंभीर जखमी

84
0

आशाताई बच्छाव

20230922_193904-BlendCollage.jpg

जारीदा परिसरात रान डुक्कराच्या हल्ल्यात आदिवासी युवक गंभीर जखमी

रात्रीला शेतकर्याचे पिकाचे केले भयानक मोठे केले नुकसान

चिखलदरा – नागेश धोत्रे

.कृषिप्रधान असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये हल्लीच्या काळामध्ये शेतकर्यांना अतिशय वाईट संकटाच्या सामना करावा लागत आहे. त्यामध्ये सध्याचा स्थितित अचानक आलेल्या परतिच्या पावसामुळे या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र मेलघाट मध्ये बहुतांश भागात दिसत आहे.तर दूसरिकडे वन्यप्राणी यांनी शेतातील पिकावर हल्ला करून शेतकर्यांचे पिकाचे पण नुकसान केल्याचे दिसून येत आहे . अशीच घटना जारीदा व्याघ्र प्रकल्प बिट ३१८ या वन परीक्षेत्रातुन अचानक आलेल्या रानडुक्कराच्या कळपामुळे बामादेही येथील आदिवासी युवक सुनील मोती बेठेकर,वय २८ वर्ष हा काही कामानिमित्त बाहेरगावी जात असतांना सकाळी ८ वाजता च्या दरम्यान २० ते २५ रान डुक्कर अचानक रस्त्याचा मधोमध आल्यामुळे सदर युवकाचा तोल बिघडल्यामुळे हा अपघात झाला.चुरणी ते जारीदा या रस्त्याचा मधोमध हा अपघात झाला आहे .हि घटना घड़ल्यावर याच रस्त्यावर शेत असलेले शेतकरी रुनु जामुनकर यांनी रुग्णवाहिका १०८ याला माहिती देऊन घटनास्थळ येथे बोलावली व ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे हालवण्यात आले .हा युवक गंभीररुपे जख्मी होता .उपचारा दरम्यान या युवकाला सहा टाके लागले .सुनील हा गंभीररुपे जख्मी असल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपुर येथे सिटीस्कैन व पुढील उपचारा करीता पाठविण्यात आले अशी माहिती ग्रामीण रुग्णालय चुरणी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वपील मेसरे यांनी दिली . याच सोबत या रान डुक्कर यांचा कळपाने तेथील शेत असलेले विनोद नामदेव अलोकार या गरीब शेतकर्याचे हाततोंडाशी आलेल्या ज्वारी,मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणे नुकसान देखील केले.सिपना वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाच्या बिट ३१८ या वन्यजीव परिसरात या रानडुक्कर यांचा व इतर प्राण्यांचा वावर असल्यामुळे जवळील शेतकर्यांचा खुप नुकसान होत आहे. शेवटी “गवे गेले आणी डुक्करे आली” अशी म्हणण्याची वेळ शेतकरी यांचावर आलेली आहे .या मुळे विनोद नामदेव अलोकार या शेतकर्याचे डुक्कराच्या धुमाकुळ मोठ्या प्रमाणे नुकसान झाला आहे .झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी व या डुक्करांच्या वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे

Previous articleलोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ; अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी
Next articleनिधन वार्ता / कोकिळाबाई पाटील     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here