Home मुंबई सभागृहात येऊन दाखवा..! शरद पवारांच्या वक्तव्याला नारायण राणेंचे केसालाही धक्का लावल्यास घर...

सभागृहात येऊन दाखवा..! शरद पवारांच्या वक्तव्याला नारायण राणेंचे केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” विधान..?

119

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0021.jpg

सभागृहात येऊन दाखवा..! शरद पवारांच्या वक्तव्याला नारायण राणेंचे केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” विधान..?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे खासदार, आमदार, तसेच मंत्री व वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘‘सरकारकडे बहुमत आहे की नाही, ते सभागृहात सिद्ध होईल. शिवसेनेचे जे आमदार बाहेर गेले आहेत, ते परत आल्यानंतर ते शिवसेनेबरोबर राहतील. विधानसभेत आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध होईल.’

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बहुमताचा विश्वास व्यक्त केल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून नारायण राणेंनी तीन वक्तव्यं केली आहेत. त्यांनी विधानसभेमध्ये बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवलाय. त्याचप्रमाणे राणेंनी संजय राऊतांचा थेट उल्लेख करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पवार यांच्या विधानामुळे आता सत्तेचा लढा विधानसभेतच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आघाडीचे नेते संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे सूचित झाले आहे. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी आधी शरद पवारांवर टीका केली. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असं ट्विट राणेंनी केलं.

Previous articleशिवसेना एक पाऊल मागे येण्यास तयार, परंतु एकनाथ शिदेंच्या मनात काही वेगळेच…?
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.