Home गडचिरोली गडचिरोली गोटुल भूमीवर बांधणार आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन (गोटुल) उभारणार

गडचिरोली गोटुल भूमीवर बांधणार आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन (गोटुल) उभारणार

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_075810.jpg

गडचिरोली गोटुल भूमीवर बांधणार आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन (गोटुल) उभारणार

गडचिरोली चांदाळा रोड वरील गोटूल भूमीच्या जमिनी संदर्भात वन विभागाच्या प्रधान सचिवांसोबत ऑनलाइन बैठक

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन बैठकीला आमदार मुंबईहून सहभागी

गोटूल भूमीची जमिनी वनविभागाकडे असल्याने तांत्रिक अडचणी दूर कशा करता येईल या संदर्भात बैठकीचे आयोजन

गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली चांदाळा रोडवरील गोटुल भूमीवर आदिवासी परंपरा ,संस्कृती जतन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी भव्य सांस्कृतिक भवन (गोटुल) उभारण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयाचे आमदार देवरावजी होळी यांचे सह गोटूल समितीचे नंदू भाऊ नरोटे यांनी स्वागत केले असून आदिवासी समाजासाठी ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी दिली.
बैठकीला मुंबई हून आमदार डॉक्टर देवरावजी होळी वन विभागाचे प्रधान सचिव प्रधान वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, तर गडचिरोली मुख्यवनसंरक्षक कार्यालयातून वनसंरक्षक गडचिरोली, उपवनसंरक्षक गडचिरोली यांचे सह गोटूल समितीचे नंदूभाऊ नरोटे प्रामुख्याने सहभागी झाले होते.

मागील अनेक वर्षांपासून चांदाळा रोड गडचिरोली येथील गोटुल भूमीचा प्रश्न प्रलंबित आहे . या ठिकाणी नित्य नियमित आदिवासी देवी देवतांची पूजा केली जाते. परंतु सदर जमीन वनविभागाकडे असल्याने आदिवासी समाजाला ही जमीन अजूनही न मिळाली नाही.ही जमीन आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी गोटुल भूमी म्हणून मिळावी असा लढा विविध आदिवासी संघटना तथा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात सातत्याने देत आहेत. या संदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे बैठकी संदर्भात विनंती केली होती. त्यानुसार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील तांत्रिक अडचणी कशाप्रकारे दूर करता येतील यासाठी सदर बैठकीचे आयोजन प्रधान सचिवाच्या उपस्थितीत घेण्याची सूचना केली होती त्यानुसार सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

Previous articleराम मंदिर सोहळा;परळीत भाजपाच्या वतीने सोमवारी वैद्यनाथ मंदिर समोर दिपत्सव
Next articleमिशन अयोध्या मंदिर स्वछता अभियान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here