Home बीड राम मंदिर सोहळा;परळीत भाजपाच्या वतीने सोमवारी वैद्यनाथ मंदिर समोर दिपत्सव

राम मंदिर सोहळा;परळीत भाजपाच्या वतीने सोमवारी वैद्यनाथ मंदिर समोर दिपत्सव

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_075404.jpg

राम मंदिर सोहळा;परळीत भाजपाच्या वतीने सोमवारी वैद्यनाथ मंदिर समोर दिपत्सव

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड /परळी वैजनाथ दि:१८ – अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने सोमवारी 22 जानेवारीला वैजनाथ मंदिरासमोर दिपउत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडत आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रामभक्त मध्ये मोठा जल्लोष आहे. आयोध्यातील राम मंदिराचे सकाळी लवकर लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी ०६ वाजता परळी शहरात भाजपाच्या वतीने मंदिरासमोरील पायऱ्यावर दीपउत्सव साजरा करून लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळुन टाकण्यात येणार आहे. यावेळी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. दीपोत्सव कार्यक्रमाला शहरातील रामभक्त महिला भगिनी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवारी अयोध्यानगरातील मंदिरात कार्यक्रम

जलालपूर रोडवरील अयोध्या नगरातील मंदिरात रविवारी २१ तारखेला दुपारी एक वाजता परिसरातील रामभक्तांनी मंदिरात आयोजित केलेल्या कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमास पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमास देखील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here