• Home
  • *करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी* *शारदीय नवरात्रोत्सव*

*करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी* *शारदीय नवरात्रोत्सव*

मृ*करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी* *शारदीय नवरात्रोत्सव*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क* ब्युरो टीम कोल्हापूर 

करवीर निवासीनी श्री.महालक्ष्मी शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची महापूजा “पराश्रू महाविष्णुस्वरूपात ”
यंदाचा नवरात्रउत्सवामधे करवीर निवासीनीच्या महात्म्याचे निवडक स्तोत्रामधुन होणारे दर्शन ही संकल्पना राबविली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्री करवीर निवासिनीचे व्यापक आणि आदिशक्ती स्वरूपच वारंवार प्रगट होताना दिसते,
कधी ते शिवाचे संहारकार्य करताना दिसते, तर कधी ब्रम्हाचे निर्माणकार्यही करताना दिसते ,तर कधी , विष्णूचे पालनकार्यही तीच करत आहे. ब्रम्हाविष्णु-शिवाचे जननी ही तिच आणि आत्मशक्तीही आहे.
द्वितीयेला करवीर निवासिनी ही पराशराना महाविष्णूस्वरूपात आज दर्शना देताना विराजमान झाली आहे. याची पार्श्वभूमी अशी की श्री महालक्ष्मी घोर तप करणाऱ्या पराशराना महाविष्णूस्वरूपात दर्शन देते तेव्हा त्याचा सर्व संशय भेदभाव फिटतो .आणि महालक्ष्मीला विष्णूस्वरूपिणी जाणून त्याच्यापुढे नतमस्तक होतात. सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाणे देवीची स्तुती करतात.

आजची पुजा श्रीपुजक माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली आहे.
मोहन शिंदे कोल्हापूर

anews Banner

Leave A Comment