Home पालघर वनपाल व वनमजुरांच्या सेवा विषयक तक्रार निवारण सभा पार पडली.

वनपाल व वनमजुरांच्या सेवा विषयक तक्रार निवारण सभा पार पडली.

95
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220403-WA0115.jpg

वनपाल व वनमजुरांच्या सेवा विषयक तक्रार निवारण सभा पार पडली.                                                                                पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

म. रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना चे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचा नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळासह राज्यातील वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांचा सेवा विषयक तक्रार निवारण सभा व राज्याचे वनबल प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पि. राव यांचा दालनात पार पडली. वनरक्षक – वनपाल, वनमजूर यांचा सेवा विषयक समस्यांचे लेखी निवेदन वनबल प्रमुख यांना सादर करण्यात आले. प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर वनबल प्रमुख यांनी सदर अडचणी सोडविण्या करीता वन प्रशासनातर्फे अति शीघ्र कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन संघटनेचा शिष्टमंडळास दिले.
नियोजित तक्रार निवारण बैठकीत वनबल प्रमुख यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) श्रीनिवास राव, उप वनसंरक्षक (प्रशासन) कुमार स्वामी या वरीष्ठ अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थित होती. सदर बैठकीत प्रामुख्याने वनरक्षकांना विहित कार्यपद्धती अवलंबुन लवकरात लवकर पदोन्नती मिळणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सर्व क्षेत्रीय कर्मचार्‍यांना मिळणे, अन्यायकारक वेतन श्रेणी दूर करणे, संप काळ हा कर्तव्य काळ मानून संप काळातील वेतन मिळण्याबाबत, सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी अद्यावत करणे, बदली व पदस्थापना बाबत पारदर्शकता आणणे, विभागीय चौकशी प्रकरणांचा विहित कालावधीत निपटारा करणे, सेवा विषयक अडी-अडचणी सोडविण्यासाठी वृत्त स्तरावर नियमित बैठका आयोजित करणे, सेवा पुस्तकांची दुय्यम प्रत पुरविणे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत्तर कामाचा निधी वर्ग न करणे, कायम प्रवास भत्त्यात वाढ करणे, वन क्षेत्राची सीमा व हद्द कायम करणे, वनखात्याची पुनर्रचना करणे इत्यादी मुद्द्यावर साधक बाधक चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला व उर्वरित विषयांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्वाही वनबल प्रमुख यांनी संघटनेचा शिष्टमंडळास दिली.

Previous articleहळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांची बिनविरोध निवड गावकारभार गावगाडा
Next articleवडनेर भैरवचा जंगम नाग्या गोप्या देवळा तालुक्यात सट्टा मटक्यातून भरतो स्वतःच्या कोप्या..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here