Home नाशिक वडनेर भैरवचा जंगम नाग्या गोप्या देवळा तालुक्यात सट्टा मटक्यातून भरतो स्वतःच्या कोप्या..!

वडनेर भैरवचा जंगम नाग्या गोप्या देवळा तालुक्यात सट्टा मटक्यातून भरतो स्वतःच्या कोप्या..!

68
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220406-181021_Google.jpg

वडनेर भैरवचा जंगम नाग्या गोप्या
देवळा तालुक्यात सट्टा मटक्यातून
भरतो स्वतःच्या कोप्या..!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
देवळा,दि.६- ज्या जुगारामुळे महाभारत घडले.द्रौपदीचे सर्वस्व हरवले.याच जुगारात द्रौपदीला जुगाराच्या डावासाठी गहाण ठेवले गेले.अशा या महाभयानक जुगाराची सुरुवात रतन खत्री याने सट्टा मटकाच्या माध्यमातून केली खरी.मात्र या सट्टा मटकाच्या अवैध धंद्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करुन त्यांना देशोधडीला लावले.तर या अशा सट्टा मटका माफीयांच्या अवैध व्यवसायामुळे कित्येक आयाबहिणी रोजच तळतळाट देऊन शिव्याशाप देत असल्याचे व आपल्याच सुखी संसाराची बरबादी या सट्टा माफीयांमुळे होत असल्याचे विदारक चित्र सध्या देवळा तालुक्यात बघावयास मिळत आहे.
मुळचा चांदवड तालुक्यातल्या वडनेर भैरवचा असलेला सट्टा माफीया नाग्या गोप्या जंगम याने देवळा तालुक्यात व शिवनेरी हाँटेललगत आपल्या अवैध सट्टा मटका धंद्याचे प्रस्थ वाढविलेले असून,त्यामुळे परिणामी या भागात शेतकऱ्यांना शेतातील मजूरीसाठी मजूरवर्ग मिळणेही जिकीरीचे ठरत आहे.हताश झालेला शेतकरी वर्ग मजूराअभावी चिंतेत सापडला आहे,तर आपला घरधनी जुगाराच्या नादी लागून संसाराची बरबादी करीत असल्याने मायभगिनी संताप व्यक्त करीत आहेत.मात्र सारे काही आलबेल या न्यायाने पोलिस प्रशासनासुध्दा या अशा वाममार्गाला लावणाऱ्या अवैध धंद्याचा बिमोड करण्याऐवजी डोळेझाक करतात तेव्हा निश्चितच वाटते की,पोलिसांची काही आर्थिक मिलीभगत तर या सट्टा माफीयांशी नाही ना? असाही सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.वास्तविक सट्टा मटका जुगाराच्या नादी लावून युवा पिढी उध्वस्त व बरबाद करण्याचे अवैध कार्य वडनेरहून देवळ्यात येऊन नाग्या गोप्या जंगम हे करीत असतानाही देवळा पोलिसांना त्याची गंधवार्ता किंवा माहिती असू नये म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विनासायास मिळणारा अवैध धंद्यातील रग्गड व बख्खळ कमाई मिळवून देणारा हा सट्टा मटक्याचा धंदा असल्याने म्हणूनच नाग्या गोप्या जंगमने आपले पाय देवळ्यात रोवले आहेत.एक मात्र खरे की,सट्ट्याच्या विना कष्टाने मिळणाऱ्या कमाईतून नाग्या गोप्याने मात्र लोकांचे उखळ पांढरे करण्याबरोबरच हरामाच्या कमाईतून स्वतःच्या कोप्या (घरे) भरण्याची ही लावलेली शक्कल मात्र युवा पिढी उध्वस्त करणारीच आहे.

Previous articleवनपाल व वनमजुरांच्या सेवा विषयक तक्रार निवारण सभा पार पडली.
Next articleदेशातील महागाईमुळे सामान्य माणसांचे नियोजन कोलमडले – डाॕ मिनलताई पा.खतगावकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here