Home विदर्भ SP अरविंद चावरिया ट्रेनिंगसाठी रवाना; जिल्ह्याचा पदभार ASP श्रवण दत्त यांच्याकडे   

SP अरविंद चावरिया ट्रेनिंगसाठी रवाना; जिल्ह्याचा पदभार ASP श्रवण दत्त यांच्याकडे   

124
0

राजेंद्र पाटील राऊत

SP अरविंद चावरिया ट्रेनिंगसाठी रवाना; जिल्ह्याचा पदभार ASP श्रवण दत्त यांच्याकडे                                     बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे पोलीस अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या ट्रेनिंगसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे काल, ७ फेब्रुवारीपासून पुढील २२ दिवस अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रवण दत्त यांनी जिल्ह्याचा कारभार स्वीकारला आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रशिक्षणासाठी श्री. चावरिया रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढील २२ दिवस ते नसल्याने श्रवण दत्त यांना जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. जवळपास गेल्या दीड वर्षापासून श्री. चावरिया यांनी कारभार सांभाळताच गुन्हेगारांचे धाबे दणाणलेले आहेत. कर्तव्यदक्षतेमुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढील २२ दिवसांची जबाबदारी सांभाळण्याचे मोठे आव्हान श्रवण दत्त यांच्यासमोर असणार आहे.

Previous articleव-हाणेत सट्टा माफीयाचे थैमान; !! जनता कंगाल सट्टामाफीया मालामाल.!!
Next articleसुभाष ढवळेंना सामाजिक कार्याची आवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here