राजेंद्र पाटील राऊत
सुभाष ढवळेंना सामाजिक कार्याची आवड.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
श्रीगोंदा येथे स्थायिक असलेले सुभाष
ढवळे यांना सामाजिक कार्याची अत्यंत आवड होती. काहीतरी सामाजिक कार्य सोशल मिडिया च्या माध्यमातून (व्हाट्सएप )करावे. यासाठी त्यानी २०१७ पासुन वधु- वर ग्रुप तयार करून श्रीगोंदा, अहमदनगर, पुणे ,सोलापूर, जळगाव या जिल्ह्यासह राज्यातील तरुणांना एकत्र करत तरुणांची वैयक्तिक माहिती ग्रुप वर प्रसारित करून मुला मुलींच्या शिक्षण व एकमेकांना पसंत करणाऱ्या जवळपास नवतरुण विवाह करण्यात जामखेडचे श्रीयुत सुभाष ढवळे यांना यश आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियाचा त्यांनी चांगल्या कामासाठी वापर केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना सोयरीक जमवण्याचा छंद जडला नंतर त्यांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करून आज पर्यंत 220 विवाह जमवले आहेत.श्री. ढवळे हे जामखेड तालुक्यातील हाळगाव या गावचे रहिवासी असून गेल्या सात वर्षापासून त्यांनी लग्न जमण्यासाठी सामाजिक कार्यास सुरुवात केली असून सर्व धर्मातील मुला मुलींच्या पालकाच्या गावी स्वखर्चाने जाऊन खात्री करून विवाह जमवण्याच्या कामात सुरुवात केली सोशल मीडियाच्या माध्यमातून ढवळे वधुवर ग्रुप माध्यमातून जवळपास सर्व महाराष्ट्रातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावी जाऊन पालकांची भेट घेऊन अपेक्षा जाणून घेतात अशा पद्धतीने ते वधू-वरांचे विवाह जमवतात सध्या मुलींचे प्रमाण कमी असल्याने मुलांचे आई-वडील सुरज ढवळे यांच्याकडे विवाह जमण्यासाठी मागणी करत असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले व हा उपक्रम आपण जीवनभर राबवणार असल्याचे सांगितले.