Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना करणार १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय समोर धरणे...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना करणार १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन…..

137
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना करणार १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन…..

पालघर(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क):-मौजे नवली पालघर ता.जि.पालघर येथील भुमापण क्रमांक व उपविभाग ४८/१/१/१/१/अ१ एकूण क्षेत्र २३.१३.८७ पैकी ०,७०,० हे आर. महाराष्ट्र सरकार गुरचरण जमिनीवर झालेले बेकायदेशीर कारखान्याचे बांधकाम निष्कासित करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी २०१६ ला अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत आदेश देऊनही तहसीलदार पालघर व मुख्याधिकारी नगर परिषद पालघर हे अधिकारी संबंधित अतिक्रमणावर कारवाई करत नसल्याने दिनांक १०- फेब्रुवारी पासून तहसीलदार कार्यालय पालघर समोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी बेमुदत धरणे आंदोलन-उपोषण करणार आहेत.

पत्रकार हा चौथा स्तंभ ओळखला जातो. पत्रकार हा स्वतःच्या हितासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर लढतो अशा या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने जो हा धरणे आंदोलन- उपोषण घेतला आहे. या उपोषणाला MINORITIES DEMOCRATIC PARTY च पूर्ण पाठिंबा आहे. व या उपोषणात आम्ही सुद्धा सहभागी आहोत. MINORITIES DEMOCRATIC PARTY कडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना यांना १० फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात येईल.

तसेच या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या या बेमुदत धरणे आंदोलन-उपोषण करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनात नागरिकांनी आपला सहभाग देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा यांना सहकार्य करावे.

Previous articleसुभाष ढवळेंना सामाजिक कार्याची आवड.
Next articleबेटमोगरा येथे रमाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने१२४ वा.रमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा. “करुणेचा महासागर म्हणजे माता रमाई आंबेडकर – गंगाधर सोंडारे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here