Home नांदेड देशातील महागाईमुळे सामान्य माणसांचे नियोजन कोलमडले – डाॕ मिनलताई पा.खतगावकर

देशातील महागाईमुळे सामान्य माणसांचे नियोजन कोलमडले – डाॕ मिनलताई पा.खतगावकर

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220406-WA0013.jpg

देशातील महागाईमुळे सामान्य माणसांचे नियोजन कोलमडले – डाॕ मिनलताई पा.खतगावकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि.०५ केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील महागाई मध्ये प्रचंड वाढ होत आहे.इंधन दरवाढीमुळे वाहतुकीवर परिणाम झाले आहेत.वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या तरुणांच्या हातातील रोजगार काढून घेण्याचे काम केंद्रसरकार कडून करण्यात येत आहे.प्रचंड वेगाने महागाई वाढल्याने सामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले असून सामान्य गृहीणींचे नियोजन बिघडल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्षा डाॕ मिनलताई पाटिल खतगावकर यांनी केले.केंद्रसरकारच्या ध्येय-धोरणांवर टिका करत महागाईचा तिव्र निषेध केला.
महागाईविरोधामध्ये जयघोषणा करित महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलनाअंतर्गत दि.०५ एप्रिल रोजी बिलोली तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने पेट्रोल डिझेल गॕस सिलेंडर भरमसाठ दरवाढीविरोधामध्ये टाळं-ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.जिल्हा कॉंग्रेस कमिटीउपाध्यक्षा डाॕ मिनलताई पाटील खतगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी खतगावकर यांनी महागाईविरोधामध्ये केंद्रसरकारच्या ध्येय-धोरणांवर जोरदार टिका केली.निवडणुकीची संधी साधून इंधन दरवाढ केली.महागाईचा आगडोंब उसळला असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.महागाईचा मोठा गंभीर प्रश्न असतानाही इतर अनावश्यक विषयाकडे लक्ष वेधत असल्याचे सांगितले.महिला-युवक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रसरकार अपयशी ठरले असून देशामध्ये जातीयवाद वाढविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.यावेळी नगराध्यक्षा सौ.मैथिलीताई संतोष कुलकर्णी,बाळासाहेब पाटील खतगावकर,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी पाटिल पाचपिंपळीकर,भिमराव जेठे,नागनाथ तुम्मोड,नगरसेवक प्रकाश पोवाडे,शेख सुलेमान,नितीन देशमुख,शंकर यंकम,बाबाराव भाले,मोहन पाटील बडूरकर,मधुमतीताई सुंकलोड,सेवानिवृत्त तलाठी माधव जाधव,पं.स.सभापती लालू शेट्टीवार,ॲड शंकरराव कुरे,शंकर मावलगे,अमजत चाऊस,किशन पटाईत,डाॕ मनोज शंखपाळे,खंडू खंडेराय,अशोक पाटिल कदम,भरत पवार,गंगाधर भिंगे,राजू पोतनकर,वलियोद्दीन फारुखी,मुन्ना पोवाडे,संतोष पाटिल खतगावकर,नगरसेवक मुखत्यार शेख,शिव पाटील चनपनोर,जावेद कुरेशी,नवाब शेख,हाजप्पा सुंकलोड,शिवाजी गायकवाड,लक्ष्मण शेट्टीवार,सयाराम निदाने,खयूम पटेल,राजू चुनडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुञसंचलन दिलिप पांढरे यांनी केले.यावेळी तहसिलदार श्रिकांत निळे यांना तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
———— ————
यावेळी जिल्हा उपाध्यक्षा डाॕ मिनलताई पाटील खतगावकर,तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील,आनंद बिराजदार,अनुप अंकुशकर,शंकर मावलगे,डाॕ मनोज शंखपाळे यांची समयोचित भाषणांमधून महागाईचा तिव्र निषेध केला.
———— ————
केंद्रसरकारच्या महागाईविरोधामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बिलोली-कुंडलवाडीसह ग्रामीण भागातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची लक्षणिय उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here