Home नांदेड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती. ज्या...

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती. ज्या शासकिय कार्यालयात सामान्य नागरीकांना त्रास होत असेल तिथे नागरीकांना न्याय मिळवून देईल – आशिष शेळके.

204

राजेंद्र पाटील राऊत

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती.

ज्या शासकिय कार्यालयात सामान्य नागरीकांना त्रास होत असेल तिथे नागरीकांना न्याय मिळवून देईल – आशिष शेळके.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
किनवट : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या आरटीआय कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी पत्रकार आशिष शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली, दिनांक १७ मार्च रोजी मुंबई येथील कार्यालयात, कार्यकर्ता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशी नुसार व सर्वानुमते आशिष शेळके यांची किनवट तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. पण दिनांक २९ मार्च रोजी नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन ही बातमी आज प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
पत्रकार बांधवांना बोलताना आशिष शेळके म्हणाले की, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेचा एकमेव उद्देश म्हणजे, केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचा वापर योग्य ठीकाणी व योग्य पद्धतीने करुन, भ्रष्ट शासकीय कार्यालय व अधिकारी यांना धडा शिकवुन सामान्य नागरीकांना मदत करणे हा आहे. मी नक्कीच या पदाचा उपयोग करून आणि सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली व राज्यातील संघटनेतील सर्व आरटीआय कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रशासन पारदर्शी, लोकाभिमुख व भ्रष्टाचार मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करीन. ज्या शासकिय कार्यालयात सामान्य नागरीकांना त्रास होत असेल तिथे नागरीकांना न्याय मिळवून देईल. जेथे भ्रष्टाचार होत असेल तेथील भ्रष्टाचार उघड करेल आणि माहिती अधिकार कायद्याचा सर्व शासकीय कार्यालयात योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी वापर करेल, असे सांगितले.
आशिष शेळके यांच्या नियुक्ती चे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे, तसेच या नियुक्तीने आता भ्रष्ट कार्यालय व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Previous articleदेशातील महागाईमुळे सामान्य माणसांचे नियोजन कोलमडले – डाॕ मिनलताई पा.खतगावकर
Next articleभाजपा स्थापना दिन आमदार जनसंपर्क कार्यालय मुखेड येथे उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.