Home भंडारा नागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी...

नागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी जी रंगारी

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_095148.jpg

नागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी जी रंगारी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) 20 मार्च 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावून मानव मुक्तीच्या युद्धाची सुरुवात केली त्याच वर्षी 25 डिसेंबर 1927 रोजी स्त्रिया शूद्र व अतिसुंद्रांच्या या गुलामीतला धार्मिक आधार देणाऱ्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथाचे जाहीर दहन केले .भारतीय समाज मनावर याच मनुस्मृतीतील नियम व कायद्याचे अधिराज्य होते त्या मनुस्मृतीला आग लावून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेवर आधारित मनुवादी व्यवस्थेला आव्हान दिले .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा समाजाला एक संदेश दिला समाज जागृतीच्या अग्नी तुम्ही कधी देता कामा नये याला अनुलक्ष्मी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला स्त्रि मुक्ती परिषदेची परंपरा निर्माण केली तसेच 25 डिसेंबर २०२३ ला नागपूर येथील कस्तुरचंदपार्क येथे भव्य मनुस्मृति दहन दिनानिमित्त स्त्री मुक्ती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी 12 वाजता ही महिला परिषद आयोजित असून या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार त्याचप्रमाणे माननीय रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा संघटक डी .जी .रंगारी यांनी एका प्रसिद्ध पत्रकार केलेले आहे.

Previous articleअतिदुर्गम आंबापाणीला 20 किलोमीटर पायपीट करत पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद
Next articleशिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस उपोषण सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here