Home जळगाव अतिदुर्गम आंबापाणीला 20 किलोमीटर पायपीट करत पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद

अतिदुर्गम आंबापाणीला 20 किलोमीटर पायपीट करत पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_094303.jpg

अतिदुर्गम आंबापाणीला 20 किलोमीटर पायपीट करत पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद

निवडणूक, शिक्षण, आरोग्य व मुलभूत सुविधांची जाणून घेतली माहिती

योगेश पाटील, जळगांव.

जळगाव : सातपुडा पर्वतरांगात बसलेलं अतिदुर्गम असं आंबापाणी (ता.यावल) गावं….या गावातील आरोग्य, शिक्षण व मुलभूत सुविधा जाणून घेण्याची जिज्ञासा…. यासाठी गावातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थोडी – थोडकी नव्हे तर तब्बल २० किलोमीटरची पायपीट करत पोहोचणारे जळगाव जिल्ह्याचे पहिले
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ठरले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांसोबतच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनीही पायपीट केली. त्यामुळे दुर्गम आंबापाणी गावात पायपीट करत पोचणाऱ्या त्या पहिल्या महिला तहसीलदार ठरल्या आहेत. आंबापाणी येथे जाण्यासाठी हरीपुरा गावापासून पायी चालत प्रवास करावा लागतो, परतीचा प्रवास करुन हे अंतर सुमारे २० किलोमीटर होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाचा निर्धार करत हरीपुरापासून चक्क पायपीट प्रवास करत आंबापाणी गाठले.

आंबापाणीला पोहचल्यावर त्यांनी मतदार यादीतील नोंदणी विषयी माहिती घेतली, मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. चोपडा मतदार संघातील हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव कच्चे मतदान केंद्र आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे शाळेचे आणि अंगणवाडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कारणांचा शोध घेवून त्यांची नोंदणी वाढविण्यात यावी.

मयत मतदारांची नावे देखील तत्काळ कमी करण्यात यावेत. मतदान केंद्रावर मतदान पथकातील टीम आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा योग्य पद्धतीने नियोजन करण्यात यावे. मतदार केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व लोकांनी मतदान करण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांना यावेळी केले.

जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शैक्षणिक स्थिती बद्दल माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी शिक्षकांना दिल्या.
ग्रामस्थांनी त्यांची कला, संस्कृती, परंपरा, शिक्षण, उपजिविका, दैनंदिनी अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.

याप्रसंगी यावल निवासी नायब तहसीलदार, निवडणूक तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Previous articleलोहा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक श्री कोकाटे साहेब यांच्या हस्ते हॉलीबॉल ग्राऊंड चे उद्घाटन.
Next articleनागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी जी रंगारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here