Home नांदेड लोहा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक श्री कोकाटे साहेब यांच्या हस्ते हॉलीबॉल...

लोहा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक श्री कोकाटे साहेब यांच्या हस्ते हॉलीबॉल ग्राऊंड चे उद्घाटन.

52
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_093938.jpg

लोहा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक श्री कोकाटे साहेब यांच्या हस्ते हॉलीबॉल ग्राऊंड चे उद्घाटन.

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा पोलीस स्टेशन येथे सन 2023 मधील वार्षिक निरीक्षण माननीय पोलीस अधीक्षक श्री कोकाटे साहेब यांनी दि.17/12/2023 केले. सदर परीक्षणा दरम्यान पोलीस स्टेशनचे कामकाज तपासण्यात आले,

निरीक्षण दरम्यान सर्व गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला,पोलीस परेड घेण्यात आली,पोलीस पाटलांची मीटिंग घेऊन त्यांना कर्तव्यबाबत माहिती दिली व अडचणी जाणून घेतल्या.वार्षिक निरीक्षण दरम्यान लोहा पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते हॉलीबॉल ग्राउंड चे उद्घाटन करण्यात आले, सदर ग्राउंड वर पोलीस अधीक्षक साहेब ह्यांनी फित कापून व पहिला बॉल मारून ग्राउंडचे उदघाट्न केले, त्यानंतर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी हॉलीबॉल खेळून आनंद घेतला.
पोलिसांच्या आरोग्यासाठी व कामाचा तान कमी करण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचोळकर व सहकारी यांनी सदर ग्राउंड तयार केले.
सदर ग्राउंड वर वेळेप्रमाणे पोलीस व लोहा नागरिक यांच्यामध्ये हॉलीबॉल चे सामने ठेवले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here