Home माझं गाव माझं गा-हाणं आखाजीचा सण लुप्त होत चालला; यापुढे फक्त परंपरा म्हणूनच साजरा होणार अक्षयतृतीयाचा...

आखाजीचा सण लुप्त होत चालला; यापुढे फक्त परंपरा म्हणूनच साजरा होणार अक्षयतृतीयाचा सण!

241
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा – -( शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- अक्षय तृतीया अर्थात ग्रामीण भागातील आखाजी सण व सणाच्या परंपरा हळू हळू हद्दपार. . . . . .अक्षय तृतीया हा सण व दिवाळी हे दोन्ही सण वर्षाचे सर्वात मोठे सण म्हणुन साजरे केले जातात. अक्षय तृतीया सणाच्या आधी पूर्वी गावातील तरुणी ह्या गौराई बसवत असत आणि सर्व मैत्रिणी काही तरी खाऊ घरून घेऊन जंगलात किवा शेतात जात असत आणि रस्त्याने जाताना लोकगीत देवाची गौराई ची गाणे म्हणताना दिसत असे आणि रस्त्याने येणार्‍या वाहनांना अडवून t त्यांच्या कडुन वर्गणी स्वरुपात पैसे घेतले जात आणि त्याचा खाऊ घेऊन दुसर्‍या दिवशी सर्वजणी खात असत लाकडी टिप-या घेऊन त्या. वाजवत गाणी म्हणत जात असत तसेच प्रत्येक घरी झोका बांधलेला असायचा आणि त्या झोका वर बसुन घरातील मुली व महिला देखील त्याच्या वर बसुन झोका घेतांना गाणी म्हणताना दिसत “आथानी कैरी तथानी कैरी हिंदळा खाय व खडक फुटना झुळझुळ पाणी वाय . व तठे मनी गौराई धूण धोय व” असे अहिराणी गाणे म्हटले जात असत. हा सण म्हणजे सुवासिनी चा सण म्हणून ओळखला जातो या दिवशी सासुरवाशीण माहेरी येत असत आणि त्या या झोका वर बसुन आपल्या कुटुंबाची व आपल्या भाऊ, आईवडील, सासू सासरे यांची महती गात असत या सणच वैशिष्टय़ म्हणजे घागर पूजन आणि घरातील सुवासिनी ला पाटावर बसवून तिची पूजा केली जात असत आणि तिने जेवण केल्याशिवाय इतर मंडळी जेवत नसते अश्या ह्या परंपरा असलेला हा सण. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गमतीदार गोष्ट म्हणजे दोन शेजारील गावातील तरुणी ह्या बार खेळण्यासाठी जात असत त्या दिवसी या दोन गावांमध्ये जणू भारत पाकिस्तान सारखी दुश्मन असल्या सारखे वाक् युद्ध टिप-या घेऊन तुंबळ गाणी गात गाण्यात शिव्या अपशब्द वापरले जात ती एक पाहण्यासारखी मजाच वेगळी असायची. अश्या या अनेक परंपरा माणसांच्या मधील कमी होत असलेल्या एकमेकांत असलेले प्रेम, जिव्हाळा आणि गोडवा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि या बरोबरच या आपल्या सणां मधील गोडवा देखील कुठे पहायला मिळत नाही, आपल्या परंपरा लुप्त होत आहेत. . . . . . . . . !

Previous articleछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर..
Next articleफुटजवळगाव येथे कोरोना लसीकरण सुरू, अमर पवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here