Home पश्चिम महाराष्ट्र फुटजवळगाव येथे कोरोना लसीकरण सुरू, अमर पवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश.

फुटजवळगाव येथे कोरोना लसीकरण सुरू, अमर पवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश.

223
0

राजेंद्र पाटील राऊत

फुटजवळगाव येथे कोरोना लसीकरण सुरू, अमर पवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

टेंभूर्णी दि. 14 : कोरोना पासून बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्त्व आता नागरिकांना पटले आहे. अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या फुटजवळगावाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याची मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी, गटविकास अधिकारी कुर्डूवाडी, तालुका आरोग्य अधिकारी कुर्डूवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी यांना निवेदनाद्वारे रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी केली व अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.
फुटजवळगाव हे 850 लोकसंख्याचे गाव असून लसीकरणासाठी गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना 7 कि.मी. अंतरावर लस घेण्यासाठी जावे लागते. गावात वयोवृध्द पुरूष व महिला यांचे प्रमाण जास्त असून तसेच शुगर, बी.पी. या आजाराचे नागरिक आहेत. त्यामुळे गावातच लस उपल्बध करून बाहेर गावी जाण्याची नागरिकांची हेळसांड थांबेल व प्रशासनावरील ताण देखील कमी होईल. टेंभुर्णी आरोग्य केंद्रास 7 कि.मी. वर जाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याने फुटजवळगाव येथेच लसीकरण सुरू करून वयोवृद्धांची हेळसांड होऊ नये ही बाब लक्षात घेऊन फुटजवळगाव येथे लसीकरण सुरू करावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी केली व अखेर लसीकरण सुरू झाले.
लसीकरणासाठी लसीचे डोस फुटजवळगाव येथे वितरित करण्यात आले. लसीकरणास प्रारंभ झाला व शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सकाळी सुरू झाले. ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिपाली शेट्टी, सिस्टर शांता बनकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हिलाले, आरोग्य सेवक उद्धव मोरे, आशा वर्कर्स अनुराधा मोहिते, रेश्मा शेख, जनाबाई जगताप, अनुराधा कोल्हे आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमोल माने, ग्रामसेवक विजय शेलार, पोलिस पाटील संजय खोचरे-पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता शिंदे, शिक्षक प्रमोद लोंढे, गावातील सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleआखाजीचा सण लुप्त होत चालला; यापुढे फक्त परंपरा म्हणूनच साजरा होणार अक्षयतृतीयाचा सण!
Next articleआपका डॉक्टर फॉउंडेशन’ चा उगम आणि कार्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here