Home पश्चिम महाराष्ट्र आपका डॉक्टर फॉउंडेशन’ चा उगम आणि कार्य

आपका डॉक्टर फॉउंडेशन’ चा उगम आणि कार्य

169
0

राजेंद्र पाटील राऊत

आपका डॉक्टर फॉउंडेशन’ चा उगम आणि कार्य
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफबिरो प्रतिनिधी महादेव घोलप.

सामजिक बांधिलकी जपून एकमेकांना मदत करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्यामुळेच आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो. आपल्या भारतीयांच्या खूप अश्या अडचणी आहेत, प्रमुख म्हणजे आरोग्य,लोकसंख्या, गरिबी,अशिक्षीत पणा, त्यामुळे प्रमुख्याने दुर्गम भागातील आरोग्य आणि शिक्षण यानां महत्व देऊन तिथे काय करता येईल हा विचार करून आम्ही खारीचा वाटा म्हणून छोटासा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्यातूनच ‘ आपका डॉक्टर फॉउंडेशन ‘ ही संकल्पना पुढे आणली . आपका डॉक्टर हे एक मोबाइल ऐप्लिकेशन आहे आणि ते तुम्हांला तुमच्या अति गरजेच्या काळात उपयोगात येते म्हणजेच तुम्ही समजा तालुका ठिकाणी आहात आणि तुम्हाला पुण्यातून डॉक्टरांचा फॉलो अप घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही घरी बसुन डॉक्टरांना बोलू शकता,तसेच एकदा की तुम्ही आपका डॉक्टर वरती तुम्ही नोंदणी करून घेतली की तुमची सगळी मेडिकल हिस्ट्री , हॉस्पिटलची बिले, रिपोर्ट,हे सगळे एका फाईल मध्ये जतन करून ठेवले जाते. आपका डॉक्टर हा खर तर सर्वसाधारण लोकांचा डॉक्टर आहे आणि हया सर्व सेवा खेडोपाड्यात पोहचल्या पाहिजेत एवढाच ऊद्देश डोळ्यासमोर ठेवून ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ” आपका डॉक्टर फाऊंडेशन ” या सामजिक संस्थेची स्थापना २५/०९/२०१९ करण्यात आली. या संस्थेने २ वर्षापासून आपले काम सुरू केले, याची सुरवात कोल्हापुर सांगली मधील २०१९ चा ओला दुष्काळी भागातून ज़ाली. आपल्या महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिक एकादशी ला लाखो लोक पायी पंढरपूर ला जातात तेव्हा पुण्यामध्ये चार ठिकाणी आपका डॉक्टरांच्या टीम ने मोफ औषधांचे वाटप आणि चेक अप केले. याचा लाभ लाखो वारकरी लोकांनी घेतला. तसेच आताची महामारी म्हणजेच कोविड-१९ च्या या काळात या सामजिक संस्थेने भारतीय जेन संघटनेसोबत (७२ कॅम्प )केले आहेत तसेच वैयक्तिक कॅम्प पण केले आहेत, याची सर्व छायाचित्रं आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. आमच्या या सामाजिक संस्थेला लोकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि हळूहळू आम्ही ग्रामीण, दुर्गम भागातही यशस्वीपणे पोहचत आहोत. आपली भारतीय संस्कृतीची हिच शिकवण आहे ” एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ” त्याचाच एक भाग म्हणून आमच्या हया संस्थेचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही खरच आमच्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. असे या आपका डॉक्टर संस्थेचे संचालक श्री,शंकर मांजरे यांनी सांगितले.

Previous articleफुटजवळगाव येथे कोरोना लसीकरण सुरू, अमर पवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश.
Next articleआज रांजणी तालुका माढा येथे आ. बबनदादा शिंदे आरोग्यमंदिर असे ५० बेड चे कोविड सेंटर उभारले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here