Home बुलढाणा शेतरस्त्याच्या वादातून मायलेकाला मारहाण दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ,कोथळी शिवारातील घटना

शेतरस्त्याच्या वादातून मायलेकाला मारहाण दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ,कोथळी शिवारातील घटना

240

आशाताई बच्छाव

Screenshot_20221013-061156_Google.jpg

शेतरस्त्याच्या वादातून मायलेकाला मारहाण
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ,कोथळी शिवारातील घटना
मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- शेतरस्त्याच्या वादातून दोघा मायलेकाला आरोपी पिता-पुत्राने लाकडी शिंगड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना कोथळी शिवारात काल बुधवार (12) घडली .या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तालुक्यातील कोथळी येथील गजेश मोहनलाल जैस्वाल (42) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार केली , त्यांची कोथळी शिवारात 12 एक्कर शेती असून त्यांच्या शेजारी काका अशोक हिरालाल जैस्वाल यांची शेती आहे . या दोघा कुटुंबात शेतरस्त्याच्या कारणावरून वाद आहेत . फिर्यादी गजेश जैस्वाल हे बुधवार (10) सकाळी 9 वाजताच्या सुमारास आई व दोन मजुरा सोबत बैलगाडीने शेतात जात होते. या वेळी काका अशोक जैस्वाल यांच्या शेतातून रस्त्याने बैलगाडी घेऊन जात असताना.अशोक जैस्वाल व त्यांच्या मुलगा सावन जैस्वाल या दोघांनी शेताला असलेले गेट बंद करून घेतले . फिर्यादी गजेश यांनी विचारणा केली असता. दोघे आरोपी पिता-पुत्रांनी शिवीगाळ करीत लाकडी शिंगाडा डोख्यात मारून जखमी केले . या वेळी फिर्यादीची आई भांडण सोडवायला आली असता .अशोक जैस्वाल यांनी तिला चापट बुक्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा या रस्त्याने आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली . या प्रकरणी गजेश जैस्वाल यांच्या तक्रारींवरून पोलिसांनी आरोपी अशोक जैस्वाल व सावन जैस्वाल या दोघांविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय यशवंत तायडे पोका सुनील भवटे करीत आहे.

Previous articleकॉलेज ला गेलेली युवती बेपत्ता
Next articleचक्क आमदार साहेब बनले बस वाहक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.