Home नंदुरबार चक्क आमदार साहेब बनले बस वाहक

चक्क आमदार साहेब बनले बस वाहक

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20221013-WA0002.jpg

चक्क आमदार साहेब बनले बस वाहक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सागर (गणेश)कांदळकर
नंदूरबार – शहादा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत होती. अनेकदा एसटी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असे. त्यात शाळकरी मुलांच्या पालकांनी स्थानिक आमदार राजेश पाडवी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. एसटी बस थांबा देणे आणि एसटी बसेसची संख्या वाढवणे अशी मागणी पालकांनी आमदारांकडे केली.

पालकांच्या तक्रारीनंतर बुधवारी आमदार राजेश पाडवी यांनी स्वत: एसटीने प्रवास करत मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार राजेश पाडवी यांनी बसवाहकाची भूमिका बजावत अक्कलकुवा ते तळोदा असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान आमदारांनी स्वतः वाहन चालकांना सूचना करत प्रत्येक गावपाड्यावरील विद्यार्थ्यांना घेत तालुक्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त हात दाखवा आणि एसटी थांबवा यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या.याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तालुक्यातील गावपाड्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत पोहचण्यासाठी कुठलीही गैरसोय होऊ नये. मुलांना शाळेत योग्य वेळेत पोहचता यावे यासाठी वेळेवर एसटी सोडावी. त्याचसोबत मुलांनी रस्त्यात हात दाखवला तरी एसटी थांबवावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

Previous articleशेतरस्त्याच्या वादातून मायलेकाला मारहाण दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ,कोथळी शिवारातील घटना
Next articleव-हाणे गावाचा विकास ग्रामसेवकाअभावी रखडला; गटविकास अधिकारी ठरले हतबल!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here