Home नाशिक व-हाणे गावाचा विकास ग्रामसेवकाअभावी रखडला; गटविकास अधिकारी ठरले हतबल!!

व-हाणे गावाचा विकास ग्रामसेवकाअभावी रखडला; गटविकास अधिकारी ठरले हतबल!!

119
0

आशाताई बच्छाव

FB_IMG_1664119931936.jpg

व-हाणे गावाचा विकास ग्रामसेवकाअभावी रखडला; गटविकास अधिकारी ठरले हतबल!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-तालुक्यातल्या व-हाणे गावच्या वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या कारकिर्दीचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण आंदोलन छेडताच ग्रामसेविका चक्क रजेवर निघून गेल्यामुळे प्रशासनाने व-हाणे गावासाठी चौकटपाडे येथील ग्रामसेवक हेमंत शिरसाठ यांच्या नियुक्तीचा व-हाणे येथे आदेश केलेला असतानासुध्दा ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे या मुद्दामच हेकेखोरपणाने व हिटलरशाहीला सुध्दा लाजवेल असे कृत्य करुन ग्रामसेवक शिरसाठ यांचेकडे पदभार न देता अडेलतट्टूची भुमिका घेऊन बसल्याने प्रशासनापुढे वेगळाच पेच निर्माण झाला आहे.तर दस्तुरखुद्द गटविकासअधिकारी जितेंद्र देवरे हतबल झाल्याचे बघावयास मिळत आहे.एक मात्र खरे की,”मेरी सुनो”व हेकेखोरीच्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या या वादात व-हाणे गावचा मात्र विकास रखडला असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.अगोदरच निलंबनाची टांगती तलवार असलेल्या ग्रामसेविका सांळुखे यांच्या या वर्तणाची प्रशासन गंभीरपणे दखल घेऊन ठोस कारवाई का करत नाही.हा उलगडण्यासारखा प्रश्न निर्माण होत आहे.व-हाणे ग्रामपंचायतीला केलेल्या रंगरंगोटीचे देखील बिले सबंधीत मजुराना मिळू शकलेली नाहीत.अशी एक ना अनेक कामे रखडून पडली असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे.चौकशी अहवालात दोषी आढलेल्या ग्रामसेविकेविरुध्द ठोस व धडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी व व-हाणे गावी कायमस्वरुपी आदेश केलेल्या शिरसाठ ग्रामसेवकांच्या तात्काळ नियुक्तीसाठी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने २८ आँक्टोबर रोजी पंचायत समितीसमोर जाहिर आत्मदहनाचा इशारा संबंधितना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Previous articleचक्क आमदार साहेब बनले बस वाहक
Next articleबीड बायपासला उड्डाणपुलाची गरज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here