Home अमरावती अंबानगरीत होणार भव्य दिव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा*

अंबानगरीत होणार भव्य दिव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा*

118

आशाताई बच्छाव

IMG_20240116_092846.jpg

अंबानगरीत होणार भव्य दिव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा*
———–
दैनिक युवा मराठा.

पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवानिमित्त शिवसेनेचे आयोजन
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त आयोजित जयंती महोत्सवात अमरावती जिल्हा शिवसेना तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अंबा नगरी अमरावतीत भव्य दिव्य असा विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा येत्या गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी होणार आहे .
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवामध्ये महिला मेळावा ,भव्य आरोग्य तपासणी व निदान शिबिर ,विविध स्पर्धा तसेच विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळा अशा विविध कार्यक्रमांची भरमार राहणार आहे. 25 जानेवारी रोजी विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याने जयंती महोत्सवाचा प्रारंभ होणार असून महेश भवन समोर साईनगर, बेनाम चौक स्थित प्रांगणात हा भव्य दिव्य पारायण सोहळा होणार आहे. 25 जानेवारी रोजी रोजी सकाळी सात वाजता सामूहिक पारायण वाचन सोहळ्यास सुरुवात होऊन ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे .श्री गुरुपुष्याच्या योगावर होणाऱ्या सोहळ्यात पुणे येथील डॉक्टर गजानन खासनीस हे व्यासपीठावरून मुखोदगक्क पारायण वाचन करणार आहे.दुपारी चार वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकारे पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो अमरावतीकर गजानन भक्त सहभागी होऊन पारायण वाचन करणार आहे. तरी भाविक भक्तांनी सामूहिक पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे .

Previous articleदुर्गाबाई डोह यात्रेत जनजागृती अंगात अतिंद्रीय शक्तींचा दावा कायद्याने गुन्हा! – हरिभाऊ पाथोडे
Next articleमोर्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक भाजपा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.