Home अमरावती मोर्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक भाजपा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

मोर्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक भाजपा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

120

आशाताई बच्छाव

IMG_20240116_093628.jpg

मोर्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक भाजपा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन – मयुर खापरे चांदुर बाजार /15 जानेवारी , – मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अंबाडा मंडळ व मोर्शी मंडळामधील फळबाग विमा कृषी खात्याने तसेच राज्य सरकारने आदेशित करून सुद्धा विमा कंपनीने अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20000 रुपये दिले नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालय मोर्शी येथे धडक दिली फळबाग पिक विमा सोबतच गारपीट अनुदान अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते तसेच रिद्धपूर मंडळ आणि अंबाडा मंडळ मध्ये खूप प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली जवळ जवळ 17000 शेतकरी बाधित झाले त्यामध्ये त्यांना फक्त 60 टक्के अनुदान नुकसान भरपाई दिली ती शंभर टक्के देण्यात यावे सर्वेक्षण करत असताना गारपीटग्रस्त यादी मधून काही शेतकऱ्यांना वगळण्यात आले त्या शेतकऱ्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात यावा तसेच एसडीआरएफ च्या धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी शासनाचे आदेश असताना सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मध्ये मिळणारी रक्कम ही अत्यल्प आहे व त्यातूनही काही शेतकरी वगळले गेलेले आहेत त्या सर्वांचा यामध्ये समावेश करावा नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आंब्या बहार गेला त्यामुळे हेक्टरी छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे या सर्व बाबींना येत्या दहा दिवसांमध्ये प्रशासनाकडून अनुकूल अशी हमी न मिळाल्यास येरला आणि अष्टगांव या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, बाजार समितीचे संचालक सारंग खोडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रुपेश वाडके, पंचायत समिती सदस्य सुनील कडू , भाजपा जिल्हा सचिव देवकुमार बुरंगे दिनेश घोरमाडे ,शरद काटोलकर, विलास आघाडे, माजी पंचायत समिती सदस्य किशोर कनेर, सभापती यादवराव चोपडे, विजय चिखले, प्रशांत राऊत, किशोर जिचकार ,गोपाल मालपे, बाळासाहेब भोजने, राजीव भोजने, मोहन उमप ,अंकुश धावडे ,शेखर गांजरे ,राजेश पेठे, गणेश घोरमाडे, प्रमोद हरणे, गजानन चौधरी, अजिंक्य लुंगे,विनोद उकंडे, सुनिल ठाकरे,साहेबराव मस्की, अंबादास गुडदे, संजय काळे, सुशील धोटे, नारायणराव सुर्वे, नवीन पेठे, संतोष पेठे ,उद्धव चिखले, सागर खांडेकर, दीपक इंगळे, मनीष दारोकर, नामदेव महल्ले, विशाल डेहणकर, अतुल टेंभे ,गोपाल टाकडे ,कुमार राऊत, नरेंद्र नंदुरकर, प्रकाश राऊत, लीलाधर चढोकार, विजय सितकारे सरपंच गणेशपूर, नंदकिशोर वाघमारे सरपंच ग्रामपंचायत मायवाडी,अशोक ठाकरे, हरिविजय गेडाम, दिगंबर खडगडे ,नवल भाऊ अग्रवाल, वसंतराव गेडाम, सुनील गेडाम, रंजीत गेडाम, प्रवीण चौधरी, प्रमोद भाकरे, शेखर गावंडे,सुभाष ठाकरे, राजू पोहोकार, विलास माथनकर, निलेश गलफट, राजेश खाटगडे, दुर्गेश केचे, निलेश गलफट, शेखर विघे, रंगराव खंडारे ,अमोल ढोमणे, नरेंद्र राऊत ,सुरज तोमर, मनोज लोहकरे, मंगेश ढगे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते

Previous articleअंबानगरीत होणार भव्य दिव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा*
Next articleचांदूरबाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम साजरा.-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.