Home अमरावती चांदूरबाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम...

चांदूरबाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम साजरा.-

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240116_094320.jpg

चांदूरबाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम साजरा.- मयुर खापरे चांदुर बाजार /15 जानेवारी, –
संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा संचलित ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम चांदूरबाजार येथे दिनांक 15 जानेवारीला भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून माननीय रवींद्र इंगोले अध्यक्ष संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा तथा ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राध्यापक प्रणित देशमुख गो . सि टॉम्पे महाविद्यालय. चांदूरबाजार .त्याचप्रमाणे पत्रकार क्षेत्रातील दिग्गज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मयूर खापरे. किशोर मेटे. अंकुश खाजणे. राहुल कविटकर. तथा ठाकूर साहेब. इत्यादी पत्रकार हजर होते. यांचा सन्मान संस्था अध्यक्ष श्री रवींद्र इंगोले यांनी केला.या कार्यक्रमाचे आयोजन विषय शिक्षक संदीप भुयार यांनी केले होते. भूगोल दिनाचे औचित्य साधून भूगोल प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी, तथा चित्र प्रदर्शनी सादर करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा खांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भूगोल प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पत्रकार क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान ही विशेष बाब ज्ञानोदय विद्यामंदिर यांच्या कडून राबवली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here