Home नाशिक प्राचार्य सी.डी.रोटे कृतीशील क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित–

प्राचार्य सी.डी.रोटे कृतीशील क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित–

127

आशाताई बच्छाव

IMG_20240115_183118.jpg

प्राचार्य सी.डी.रोटे कृतीशील क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे यांना महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त लाख मराठा प्रतिष्ठान व उत्तमराव जी ढिकले स्पोर्टस् फाऊंडेशन,नाशिक यांच्या वतीने‌ आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांचे वंशज रणजित जाधव (कराड, सातारा) यांच्या शुभहस्ते क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शुभमंगल कार्यालय,नाशिक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.हेमंत पांडे (अध्यक्ष, नाशिक जिल्हा मल्टी गेम असोसिएशन) तर प्रमुख अतिथी म्हणून मा.अशोक दुधारे (टोकियो ऑलिम्पिक गेम निरीक्षक) ,मा.आनंद खरे (शिव छत्रपती पुरस्कार विजेते ) व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच नाशिक व नगर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य सी.डी.रोटे यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित जी गुंजाळ, शिक्षण प्रसारक मंडळ वनसगाव, स्थानिक स्कूल कमिटी,स्थानिक शिक्षण सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, विशाखा समिती, माजी विद्यार्थी, पत्रकार संघ, ग्रामस्थ ,पर्यवेक्षक के.बी.दरेकर , सर्व सेवकवृंद व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleमारुंजी येथील सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत जयश्री रामदास कवडे यांची बहुमताने निवड
Next articleदुर्गाबाई डोह यात्रेत जनजागृती अंगात अतिंद्रीय शक्तींचा दावा कायद्याने गुन्हा! – हरिभाऊ पाथोडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.