Home जालना जनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल

जनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल

15
0

आशाताई बच्छाव

1000275915.jpg

‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी समाजिक आणि राजकीय कार्य करत असतांना समाजसेवेचे व्रत डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यामुळे आपली मतदारसंघातील पकड अधिक घट्ट झाली आहे. आपण हि जनसेवा हिच ईश्वर सेवा समजुन कार्य करीत राहण्याचे आवाहन आ. कैलास गोरंटयाल यांनी केले.
आ. कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी रोजी जिल्हा महिला बाल रूग्णालय येथे रूग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी आ. गोरंट्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव उगले यांनी आ. कैलास गोरंट्याल यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी आ. कैलास गोरंट्याल शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शेख महेमुद, युवानेते अक्षय गोरंट्याल यांच्याहस्ते रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राम सावंत, नारायण वाढेकर, दिनकर घेवंदे, अब्दुल बासेत कुरैशी, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, ॲड. राम कुऱ्हाडे, मनोहर उघडे, धर्मा खिल्लारे, कलीम खान, शेख ईब्राहिम, शेख इर्शाद, आसिम बागवान, फकीरा वाघ, आनंद वाघमारे, गणेश वाघमारे, शिवप्रसाद चित्तळकर, प्रमोद अल्हाट, मोहन इंगळे, गणेश चांदोडे, सय्यद जावेद अली, योगेश पाटील, विभा लाखे, मथुराबाई सोळुंके, माणिक चव्हाण, शेख वसिम शेख नुरजहा, शेख अहेमद, अनसार कुरैशी, गोपाल चित्राल, दत्ता घुले आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous articleविशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन
Next articleतुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा २५ लाख भाविकांनी घेतला लाभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here