Home मुंबई मुंबई वार्ड क्र-२६-२७ मधील नागरिक आर्सेनिक गोळ्यांच्या प्रतिक्षेत

मुंबई वार्ड क्र-२६-२७ मधील नागरिक आर्सेनिक गोळ्यांच्या प्रतिक्षेत

121
0

 

⭕मुंबई वार्ड क्र-२६-२७ मधील नागरिक आर्सेनिक गोळ्यांच्या प्रतिक्षेत⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कांदिवली -: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांकडून नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकार गोळ्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. परंतु कांदिवली पुर्वकडील असलेल्या वाॅर्ड क्र. २६ आणि २७ मधील नागरिकांना या गोळ्यासाठी प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही वाॅर्डातील झोपडपट्टीतील रहिवाशांना अद्यापही अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या न मिळाल्याने स्थानिक नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

कांदिवली पुर्वकडील पालिका आर/दक्षिण विभागातील वाॅर्ड क्र. २६ मधील दामूनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर आणि सिंग इस्टेट या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या नगरसेवकांकडुन विभागातील नागरिकांना रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्या दिल्या गेल्या नसल्याची माहिती या विभागातील काही नागरिकांनी दिली. तसेच वाॅर्ड क्र.२६ लगत असलेल्या प्रभाग २७ मधील संभाजीनगर, जानूपाडा आणि नरसीपाडा या विभागातसुध्दा स्थानिक नगरसेविका यांच्याकडून आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्या दिल्या गेल्या नाही. उलट या विभागातील नगरसेविकेने उच्चभ्रू असलेल्या लोखंडवाडा येथील इमारतीमधील नागरिकांना या गोळ्या वाटल्या.मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरंगरिब नागरिकांना मात्र हूलवत ठेवल्याचा आरोप संभाजी नगरांतील नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे आतातरी या दोन्ही विभागातील नगरसेविकांनी या संकटकालीन महामारीत दुजाभाव न ठेवता नागरिकांना वाचविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० च्या गोळ्या लवकरात लवकर वाटाव्यात,अशी मागणी वाॅर्ड क्र.२६ आणि २७ मधील नागरिकांकडून केली जात आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईतील प्रत्येक नगरसेवकांना महापालिकेकडून १० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीकडून सार्वजनिक शौचालय आणि गर्दीच विभागातील काही नागरिकांनी दिली. तसेच वाॅर्ड क्र.२६ लगत असलेल्या प्रभाग २७ मधील संभाजीनगर, जानूपाडा आणि नरसीपाडा या विभागातसुध्दा स्थानिक नगरसेविका यांच्याकडून आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्या दिल्या गेल्या नाही. उलट या विभागातील नगरसेविकेने उच्चभ्रू असलेल्या लोखंडवाडा येथील इमारतीमधील नागरिकांना या गोळ्या वाटल्या.मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरंगरिब नागरिकांना मात्र हूलवत ठेवल्याचा आरोप संभाजी नगरांतील नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे आतातरी या दोन्ही विभागातील नगरसेविकांनी या संकटकालीन महामारीत दुजाभाव न ठेवता नागरिकांना वाचविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० च्या गोळ्या लवकरात लवकर वाटाव्यात,अशी मागणी वाॅर्ड क्र.२६ आणि २७ मधील नागरिकांकडून केली जात आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईतील प्रत्येक नगरसेवकांना महापालिकेकडून १० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीकडून सार्वजनिक शौचालय आणि गर्दीच्या ठिकाणी साधी सॅनिटायझर फैवारणीसुध्दा केली जात नाही. यामुळे अशा संकटकाळात लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांसाठी किती गंभीर आहेत, हे यावरुन दिसून येत आहे….

Previous articleइचलकरंजीत सुभाष बाबर यांचे हदयविकाराने निधन* सुभाष बाबर यांचे काल रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
Next articleतुम्ही कोणत्याही व्हटसअप ग्रुपचे अँडमिन असाल तर!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here