Home अमरावती झेडपीत ९९ अनुकंपाक धारांना मिळाली नोकरी. समुपदेशनाने निवड प्रक्रिया.

झेडपीत ९९ अनुकंपाक धारांना मिळाली नोकरी. समुपदेशनाने निवड प्रक्रिया.

10
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_173923.jpg

झेडपीत ९९ अनुकंपाक धारांना मिळाली नोकरी. समुपदेशनाने निवड प्रक्रिया.
———-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जिल्हा परिषदेच्या विविध भागात कार्यरत असताना आई, वडील किंवा पतीचे अनुकंपा तत्त्वावर वारसाला नोकरी दिली जाते. त्यानुसार झेडपीतील एकूण रिक्त पदाच्या २० टक्के जागावर शुक्रवारी जिल्हा परिषदेतील गट’क’आली गट’ड’मधील विविध पदावर निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली तर सामान्य प्रशासन विभागाने डेपोटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या उपस्थितीत अनुकंपावरील तत्त्वावर रिक्त असलेल्या पदार्थासाठी की भरती प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील एकूण ९९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुकंपावर नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रते पडताळणी पात्र असलेल्या जिल्ह्याभरातील एकूण ९९ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यानुसार अनुकंपावर नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पडताळणीनुसार ९९ उमेदवारांना जिल्हा परिषदेतील विविध भागातील रिक्त असलेल्या पदावर समुपदेशन पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये स्थापत्य सहाय्यक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, अंगणवाडी पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा, परिचर आदीपदावर सामावून घेण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी निलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम, कनिष्ठ प्रशासन गजानन कोरडे, कनिष्ठ सहाय्यक राहुल रायबोले, समक्ष चांदोरे, राजू गाडे, सतीश पवार आदींनी अनुकंपा भरतीसाठी सहकार्य केले. जिल्हा परिषदेत अनुकंपावर विविध पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती यादी दिले जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ कैलास घोडके यांनी सांगितले. स्थापत्य अभियंता सहाय्यक-०८, कनिष्ठ सहाय्यक लेखा ०१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१ आरोग्य सेवक पुरुष-१९, वरिष्ठ सहाय्यक लिपिक-०२, विस्तार अधिकारी संख्यांकी लीपीक-०२ विस्तार अधिकारी संख्यांक-०२, अंगणवाडी पर्यवेक्षक-०२, औषध निर्माण अधिकारी-०२, कंत्राटी ग्रामसेवक-१८, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा-०१, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा-०४, याप्रमाणे नियुक्त दिले आहे.

Previous articleझेडपीत ९९ अनुकंपाक धारांना मिळाली नोकरी. समुपदेशनाने निवड प्रक्रिया.
Next articleघटस्फोट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here