Home जळगाव चोपडा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

चोपडा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

64
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_084049.jpg

चोपडा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

तालुका प्रतिनिधी:
सुरेंद्र बाविस्कर

चोपडा तालुक्यात काही काही ठिकाणी संध्याकाळी 4/5 वाजता विजांचा कडकडाट,वादळासह
अवकाळी पावासाने तालुक्यात बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
आज संध्याकाळी अचानक विजांचा कडकडाट,वादळासह पाऊस पडला अचानक आलेल्या या संकटा मुळे शेतकऱ्याचा शेतात काढणीस आलेल्या हरभरा,गहू, मका, बाजरी, दादर,पपई, आंबा, डांगर, टरबूज, केळी अश्या पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले असून तालुक्यात अवघ्या पंधरा दिवसात येणारे पीक सुद्धा जमीनदोस्त होऊन गेल्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे अनेक शेतकरी शेतात पिकं पाहून ढसा- ढसा रडत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे, इकडे खरीप पिकांचे नुकसान होवून विमा भरपाई मिळत नाही, अफाट उत्पादन खर्च होवून कापूस व इतर पिकांना भाव मिळत नाही
सुरवातीला हरभरा दहा हजार रुपये क्विंटल पर्यत होता आता मात्र सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलने घेतला जात आहे आणि आता मोठया प्रमाणात हरभरा. गहू कापणी, काढणीची सुरुवात झाली असून त्यात हे अस्मानी संकट उभे ठाकले आहे, शासनाने आता सर्व प्रकारे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय दिला पाहिजे हि अपेक्षा शेतकऱ्याची आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर आसमानी संकटामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाई पोटी शेतकऱ्यांना शासनाने सरसकट कर्जमाफी देऊन आधार दयावा आणि हमी भावासाठी कायदा बनवण्यात यावा तरच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल असे सर्वत्र शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
वादळी व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषी विभागा कडून पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावेत बिडगाव मोहरद वरगव्हान कुंड्या पाणी खंडणे आडगाव धानोरा परिसरात अनेक गावांच्या शेतकऱ्या च्या पिकांना फटका बसलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here