Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा लहरीपणा; अनेक पिकांच नुकसान शेतकरी संकटात!.

संग्रामपूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा लहरीपणा; अनेक पिकांच नुकसान शेतकरी संकटात!.

82
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_084409.jpg

संग्रामपूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा लहरीपणा; अनेक पिकांच नुकसान शेतकरी संकटात!. ब्युरो चीफ बुलढाणा (ज्ञानेश्वर पाटील दांदळे) संग्रामपूर तालुक्यातील बहुतेक गावात अवकाळी पावसाने दिनांक 26 फेब्रुवारी च्या सायंकाळ पासून मेघगर्जनेसह वारा व पावसाने सुरुवात केली परंतु फक्त पाऊसच नव्हे तर बऱ्याच गावात गारपिटीचा ही वर्षाव झाला. निसर्गाचा अनियमितपणे पडणारा पाऊस हा नुकसानीचा व जीवघेणाच ठरतो. संग्रामपूर तालुक्यात पडलेल्या गारपीटीच्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी केल्याचे दिसून येते अक्षरशः हरभरा गहू ज्वारी,मंका, कांदा अशा अनेक रब्बी पिकांचे नुकसान हे अवकाळी वारा,पाऊस व गारपिटीने केले असून यामध्ये वरवट, एकलारा, मारोड, लाडनापूर अश्या अनेक गावात रब्बी पिकांचे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात पडला असून शासन स्तरावर लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू आहे खरंच या देशाचा अन्नदाताचं जर निसर्गा पुढे हतबल झाला असेल आणि वारंवार निसर्ग जर अन्नदात्याच्या तोंडातील घास हिसकावून घेत असेल तर अशा वेळेस लोकप्रतिनिधीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्याकरता पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

Previous articleचोपडा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान
Next articleडॉ.संदिप तांबे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here