Home पुणे दारात बापाचा मृतदेह असताना पुण्याच्या मंगलने दिली CA ची परीक्षा; कुटुंब सांभाळण्यासाठी...

दारात बापाचा मृतदेह असताना पुण्याच्या मंगलने दिली CA ची परीक्षा; कुटुंब सांभाळण्यासाठी मोठा संघर्ष 🛑

142
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दारात बापाचा मृतदेह असताना पुण्याच्या मंगलने दिली CA ची परीक्षा; कुटुंब सांभाळण्यासाठी मोठा संघर्ष 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕परिस्थितीचं गाह्राणं गात अनेकजण स्वप्नच पहायला घाबरतात.

काही एमोजक्या लोकांचं मात्र उलटं असतं. प्रतिकूल परिस्थिती आणि संकटं जितकी तीव्र, तितकी त्यांची प्रेरणा बळकट बनत जाते. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्ससारखं आयुष्य ते जगतात.

मंगल शंकर गायकवाड ही सुद्धाही या मोजक्या लोकांपैकी एक आहे. मंगल राहते पुण्यात लोहियानगर झोपडपट्टीमध्ये. काळीसावळी, बारीक अंगकाठीची, डोळ्यांवर जाड चष्मा. मात्र नजरेत पुरेपूर आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर हसू.’सलाम पुणे’नं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मंगलची प्रेरककथा सगळ्यांसमोर आणली आहे. आपल्या छोट्याश्या पत्र्याच्या घरात बसून मंगल बोलते, ‘आजवर माझ्या घरच्यांनी जे भोगलं आहे त्यातून मला त्यांना बाहेर काढायचं आहे.

चांगलं आयुष्य द्यायचं आहे. माझी पुढची पिढी, तिचं जगणंही माझ्याहून सुखाचं झालं पाहिजे, कष्ट कमी झाले पाहिजेत. हे माझं ध्येय आहे.’ (Mangal Gaikwad struggle for CA)
मंगल आणि तिच्या कुटुंबाचं घर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत तोडलं गेलं. सध्या ते तात्पुरत्या पत्र्याच्या घरात राहतात. विज्ञान शाखेत शिकायला आर्थिक अडचण आडवी आली. मग तिला बारावीतले तिचे गुरू रविंद्र बोगम यांनी कॉमर्स घेऊन सीएची तयारी करण्याचा सल्ला दिला. तिनंही तो मानत आज इथवरचा टप्पा  गाठला. विशेष म्हणजे काही काळापूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मृतदेह दारात असताना तिनं काळजावर दगड ठेवत परीक्षा दिली.

(Inspiring story of Pune Mangal Gaikwad)
बोगम सांगतात, ‘मंगल पूर्वीपासूनच हुशार होती. माझ्याकडे कॉमर्सचे क्लास करायला बारावीत आली. परिस्थिती नसूनही माझं न ऐकता तिनं पूर्ण फी भरली. मी तिची हुशारी पाहून भारावून गेलो. पुढं पदवीच्या क्लासला मी कधीच तिला फी देऊ दिली नाही. ती माझ्या क्लासमध्ये शिकवायलाही लागली.’

मंगलला बारावीतलया गुणवत्तेमुळे 25 हजारांची शासकीय स्कॉलरशिप मिळाली. ती घेऊन तिनं पुढच्या परीक्षा दिल्या. क्लासेस केले. काही परीक्षांच्या क्लासेससाठी पूनमच्या काकांनी कर्ज काढलं आणि तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. बोगम सरांनीही तिला आर्थिक मदत केली. आजवर तिला दीडेक लाखांचा खर्च आला. तो या सगळ्यांनी निभावला. आता पुढेही अजून दीडेक लाख उभे करायचे आहेत. पण तिची जिद्द पहाडाइतकी खंबीर आहे.

आई धुणीभांडी करून संसार चालवते. मंगलनंही आजवर बालपणीपासून घर-संसाराला पहाटे उठून आधार दिला. ते सांभाळतही अभ्यासात कधीच कमी पडली नाही. आईच्या डोळ्यात तिच्याविषयी बोलताना अश्रू येतात. आई भीमाबाई म्हणते, ‘आमच्या गायकवाड घराण्यात कुणीच आजवर इतकं नाव काढलं नाही. मला तिचा अभिमान वाटतो. शेलार असल्यापासून पोरीनं पहिला नंबर सोडला नाही. शेजारी, नातेवाईक सगळे तिला मदत करतात.’
नातेवाईक, शेजारी तिच्याविषयी भरभरून कौतुकानं बोलतात. सगळ्या लोहियानगरच्या रहिवाशांना तिचा प्रचंडच अभिमान वाटतो. तिनं सीए व्हावं हे आता केवळ तिचंच नाही तर सगळ्या लोहियानगरचं स्वप्न बनून राहिलं आहे…! ⭕

Previous article🛑 IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना 🛑
Next articleइंधन दरवाढीमुळे लातूरच्या युवकाने उचलले ‘हे’ पाऊल 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here