• Home
  • इंधन दरवाढीमुळे लातूरच्या युवकाने उचलले ‘हे’ पाऊल 🛑

इंधन दरवाढीमुळे लातूरच्या युवकाने उचलले ‘हे’ पाऊल 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210310-WA0100.jpg

🛑 इंधन दरवाढीमुळे लातूरच्या युवकाने उचलले ‘हे’ पाऊल 🛑
✍️ लातूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

लातूर :⭕ राज्यात तसेच देशभरात इंधन दरवाढी विरोधात विविध आंदोलने सुरु आहेत. याच इंधन दरवढीला कंटाळून लातूर येथील एका युवकाने पेट्रोल महाग झाल्याने परवडत नसल्याने आपली लाख रुपयांची दुचाकी रागाच्या भरात पेटवुन दिली आहे. रविवारी दुपारी गावात राहत्या घराजवळ या तरुणाने या गाडीला आग लावून पेटवून दिली.

लातूर तालुक्यात खोपेगाव येथे अक्षय कमलाकर मोरे हा तरुण राहतो. अक्षय मोरे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दोन वर्षापुर्वी या व्यवसायातुन त्यांनी मोठ्या हौसेने एक महागडी दुचाकी MH २५ Z ५३५५ खरेदी केली. त्यांना दुचाकीचे वेड असल्यामुळे ही दुचाकी म्हणजे जीव की प्राण होती. मात्र सध्या वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे अक्षय मोरे यांना दुचाकी चालवणे परवडत नसे.

नजिकच्या काळात या दुचाकीचे अॅव्हेरज हे वीस पेक्षाही कमी होते. त्यात पेट्रोलचे दरांनी शंभरी गाठली त्यामुळे अक्षय मोरे यांनी आपली महागडी दुचाकी रविवारी आपल्या राहत्या घराजवळ पेटवून दिली.

पेट्रोलचे भाव गगनाला भीडल्याने अक्षय मोरे यांनी हे पाऊल उचलले. अक्षय मोरे यांनी उचललेल्या पावलामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment